Adipurush | ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का.. असे डायलॉग हनुमान…’, प्रसिद्ध अभिनेत्याकडून संताप व्यक्त

'आदिपुरुष' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; प्रसिद्ध अभिनेता संताप व्यक्त करत म्हणतो, 'कलयुगी रामायण.. टपोरी भूमिका...' सिनेमाला सर्वच स्तरातून विरोध..

Adipurush | 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का.. असे डायलॉग हनुमान...', प्रसिद्ध अभिनेत्याकडून संताप व्यक्त
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 12:14 PM

मुंबई : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील नाराजी जाहिरपणे व्यक्त करत आहेत. तर सिनेमातील डायलॉगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एवढंच नाही तर, सिनेमातील डागलॉग टपोरी स्वरुपातील आहेत, असं देखील अनेक जण म्हणत आहेत.. आतापर्यंत अनेकांनी सिनेमाचा आणि सिनेमातील डागलॉगचा विरोध केला आहे. तर आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष म्हणजे कलयुगी रामायण.. असं म्हणत सिनेमाचा विरोध केला आहे.

मुकेश खन्ना म्हणाले, ‘आदिपुरुषमुळे भयानक तमाशा होवू शकत नाही, एक मोठा तमाशा होवू शकतो.. सिनेमा पाहिल्यानंतर कळतं दिग्दर्शक ओम राऊत यांना रामायणाची जराही समज नाही. लेखक मनोज मुंतशिर यांनी तर रामायणाला कलयुगी बणवलं आहे.. सिनेमाचे डायलॉग फार बेसीक आहेत..स्क्रिनप्ले पाहिल्यानंतर झोप येईल…’

पुढे मुकेश खन्ना म्हणाले, ‘आदिपुरुष सिनेमा रामानंद सागर यांच्या रामायणाचा १०० वा भाग दोखील होवू शकत नाही.. . चित्रपटाच्या निर्मितीमध्ये असे किरकोळ संवाद लिहिल्याबद्दल आणि हनुमानजींची भूमिका अशी दाखवल्यामुळे इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही. सिनेमाबद्दल लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राऊत हे हॉलिवूडवर खूप प्रभावित झाले आहेत. ते बघूनच त्यांनी खोडसाळपणा केला आहे असं दिसतं. लिबर्टी हवी होती तर आणखी काही दुसरं केलं असतं…

हे सुद्धा वाचा

‘मेघनाद तपस्वी कमी तर WWF रेसलर अधिक वाटत होते. पूर्ण शरीरावर टॅटू… त्यानंतर चिंदी स्टाईल डायलॉग… मेघनाद कोणी टपोरी होता?’ असा प्रश्न देखील मुकेश खन्ना यांनी याठिकाणी उपस्थित केला. ‘रावणाला भयानक दाखवताय तर दाखवा, पण सिनेमातील रावण चंद्रकांतामधील विषपुरुष वाटत आहे..’

‘प्रभास एक उत्तम अभिनेता आहे. श्रीराम मिळवण्यासाठी राम अनुभवा लागतो.. फक्त बॉडी असणं पुरेसं नाही. जर तुला प्रेरणा हवी होती तर रामायणच्या अरूण गोविल यांना पाहायला हवं होतं.. ‘ मुकेश खन्ना यांनी फक्त सिनेमातील भूमिकांवरच नाही तर, डायलॉगवर देखील निशाणा साधला आहे..

‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का.. जलेगी भी तेरे बाप की… असे टपोरी डायलॉग हनुमान कसे बोलू शकतात. जी गोष्ट आपण लहानपणापासून पाहत होते, तिला गालबोट लावण्याची परवानगी सेन्सर बोर्डाने दिली तरी कशी? असा प्रश्न देखीन मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला..

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.