Adipurush सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी Link व्हायरल; निर्मात्यांना मोठा झटका
प्रभास - क्रिती सनॉन स्टारर 'आदिपूरुष' लीक; सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी Link व्हायरल... सिनेमाच्या निर्मात्यांना आणि बॉक्स ऑफिसला बसणार मोठा झटका?
मुंबई | अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपूरुष’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असलेला ‘आदिपुरुष’ शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित तर झाला आहे, पण सिनेमा ऑनलाईन देखील लीक झाला आहे. ज्यामुळे बॉक्स ऑफिस आणि निर्मात्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिनेमा ऑनलाईल लीक झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करतील की नाही? हा मोठा प्रश्न आता चाहत्यांसमोर उभा राहिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा ऑनलाईन पायरेसी प्लॅटफॉर्मवर लीक झाला आहे. ‘आदिपूरुष’ सिनेमा फिल्मीझिला, 123 मू्व्हिज, फिल्मी रॅप, टेलीग्राम आणि तामिळ रॉकर्सवर लीक झाला आहे. सिनेमा देशभरात तब्बल ६ हजार २०० पेक्षा अधिक स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ हजारांपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे..
बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण चित्रपटगृहात एक सीट हनुमान यांच्यासाठी ठेवण्यात यावी अशी घोषणा करण्यात आली आहे… सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सर्व चित्रपटगृह मालकांना यासाठी विनंती केली आहे.. चित्रपटगृहात हनुमान यांच्यासाठी एक सीट भगव्या रंगाच्या कापडाने सजवण्यात आली आहे… चित्रपटगृहात अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
‘आदिपुरुष’ सिनेमा भारतीय सिनेविश्वातील सर्वात जास्त कमाई कराणारा सिनेमा ठरु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तब्बल ७०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांची ओटीटी प्रदर्शनासाठी देखील डील पक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. तब्बल २५० कोटी रुपयांमध्ये डील मंजूर झाल्याची चर्चा रंगत आहे. सिनेमाने म्यूझीक, सॅटेलाईट आणि सोशल मीडिया राइट्स विकून ४३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.