Adipurush | “आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जिवंत जाळून..”; रागाच्या भरात मुकेश खन्ना यांचं धक्कादायक वक्तव्य

मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील कलाकारांच्या लूकवरूनही जबरदस्त टीका केली. "यांनी हनुमानाला चामड्याचे कपडे परिधान करायला दिले. श्रीराम यांना चामड्याचे सँडल दिले. श्रीराम यांना मिशी असू शकत नाही, कृष्ण, विष्णू यांनाही मिशी असू शकत नाही," असं ते म्हणाले.

Adipurush | आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जिवंत जाळून..; रागाच्या भरात मुकेश खन्ना यांचं धक्कादायक वक्तव्य
Mukesh Khanna on AdipurushImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 9:44 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. सर्वसामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी या चित्रपटावर संताप व्यक्त करत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनीही ‘आदिपुरुष’च्या निर्माते-दिग्दर्शकांची शाळा घेतली. ही वाढती नकारात्मक प्रतिक्रिया पाहून या चित्रपटातील काही संवादसुद्धा बदलण्यात आले आहेत. मात्र आता ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी रागाच्या भरात असं काही म्हटलंय, जे ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. “आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जिवंत जाळलं पाहिजे”, असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

“संपूर्ण टीमला जिवंत जाळून टाका”

मुकेश खन्ना यांनी याआधीही ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीमवर राग व्यक्त केला होता. त्यांनी चित्रपटावर बंदीचीही मागणी केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “त्यांना माफ केलं जाणार नाही. मी माझ्या युट्यूब चॅनलवरही म्हटलंय की त्यांना 50 डिग्री तापमानात जिवंत जाळलं पाहिजे.”

संवादलेखक मनोज मुंतशीर यांची घेतली शाळा

‘आदिपुरुष’चे संवादलेखक मनोज मुंतशीर यांच्यावर ताशेरे ओढत मुकेश खन्ना म्हणाले, “असं म्हणतात की मनोज मुंतशीर हे फार मोठे लेखक आहेत. मी त्यांना कधीच फॉलो केलं नाही पण त्यांचं बालिश वक्तव्य ऐकून मला खूप वाईट वाटलं. मला वाटलं की इतक्या टीकांनंतर जेव्हा संपूर्ण हिंदुस्तान चित्रपटाविरोधात उभा आहे तर हे गप्प बसतील. पण हे आधी म्हणाले वाल्मिकीजींचं व्हर्जन आहे, नंतर म्हणाले तुलसीदासजींचं व्हर्जन आहे, त्यानंतर रामानंद सागरजींचं व्हर्जन म्हणाले. आता म्हणतायत की हे माझं व्हर्जन आहे. अरे भाई, आप किस खेत की मूली हो?”

हे सुद्धा वाचा

कलाकारांच्या लूकवरून टीका

मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील कलाकारांच्या लूकवरूनही जबरदस्त टीका केली. “यांनी हनुमानाला चामड्याचे कपडे परिधान करायला दिले. श्रीराम यांना चामड्याचे सँडल दिले. श्रीराम यांना मिशी असू शकत नाही, कृष्ण, विष्णू यांनाही मिशी असू शकत नाही. त्यांना पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो. निर्माते भूषण कुमार तर त्यांच्या वडिलांच्या परंपरेला पुढे नेत आहेत की त्यांचं नाव खराब करत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.