Adipurush | ‘आदिपुरुष’चा पहिला दिवस ठरणार हाऊसफुल्ल? एका तिकिटासाठी मोजावे लागतायत इतके रुपये

आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच 36 हजार तिकिटं विकली गेली आहेत. रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभासने राघव, क्रितीने जानकी, सनी सिंहने लक्ष्मण आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे.

Adipurush | 'आदिपुरुष'चा पहिला दिवस ठरणार हाऊसफुल्ल? एका तिकिटासाठी मोजावे लागतायत इतके रुपये
आदिपुरुष
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 10:00 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या 16 जून रोजी देशभरातील विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या मुख्य भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्येही चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता आहे. आदिपुरुषची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून त्यालाही दमदार प्रतिसाद मिळतोय.

दिल्ली- टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार दिल्लीतील वेगास लक्स आणि द्वारका या पीव्हीआरमध्ये आदिपुरुषच्या तिकिटासाठी प्रेक्षकांना तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागले आहेत. या थिएटरमधील पहिल्या दिवसाची सर्व तिकिटं विकली गेली असल्याने दुसऱ्या दिवशीसुद्धा एका तिकिटासाठी 1800 रुपये मोजावे लागतील.

नोएडा- नोएडाच्या पीव्हीआर गोल्ड, लॉजिक्स सिटी सेंटरमध्ये आदिपुरुषचं एक तिकिट 1650 रुपयांना आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई- मुंबईतील पीव्हीआर लिव्हिंग रुम, ल्यूक्स, जियो वर्ल्ड ड्राइव्ह, बीकेसी याठिकाणी आदिपुरुषच्या सर्व शोजसाठी प्रेक्षकांना 2000 रुपयांची तिकिट विकत घ्यावी लागणार आहे. तर आयनॉक्स, अट्रिया मॉल इनसिग्निया याठिकाणी 1700 रुपयांचं एक तिकिट आहे. या थिएटरमध्येही पहिल्या दिवसाची तिकिटं विकली गेली आहेत.

बेंगळुरू- बेंगळुरूच्या पीव्हीआर, डायरेक्टर्स कट, आरईएक्स वॉक याठिकाणी तिकिटांचे दर 1600 ते 1800 रुपयांदरम्यान आहेत. तर पीव्हीआर गोल्ड, व्हीआर बेंगळुरू, व्हाइटफिल्ड रोड याठिकाणी तिकिटांचे दर 1150 ते 1250 रुपयांदरम्यान आहेत.

कोलकाता- कोलकातामधील साऊथ सिटी मॉलमध्ये 1060 रुपयांना आणि आऊस्ट मॉलमध्ये 1090 रुपयांना एक तिकिट आहे.

चेन्नई- कासी टॉकीज डॉल्बी ॲटमॉस, अशोक नगर याठिकाणी 225 रुपये, कुमारन थिएटर प्रोवा 4K डॉल्बी ॲटमॉस, मादिपक्कम याठिकाणी 150 रुपयांना तिकीट उपलब्ध आहेत.

हैदराबाद- हैदराबादच्या प्रसाद मल्टिप्लेक्समध्ये हिंदी शोसाठी 295 रुपयांना तिकिटे उपलब्ध आहेत. तेलगू शो सिनेपोलिस: CCPL मॉल मलकाजगिरी याठिकाणी 325 रुपये आणि सिनेपोलिस: मंत्रा मॉल, अट्टापूर याठिकाणी 380 रुपयांमध्ये तिकिटं उपलब्ध आहेत.

आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच 36 हजार तिकिटं विकली गेली आहेत. रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभासने राघव, क्रितीने जानकी, सनी सिंहने लक्ष्मण आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. अभिनेता सैफ अली खान यामध्ये लंकेशच्या भूमिकेत आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.