Adipurush Twitter Review | प्रभासचं कौतुक तर VFX वर नाराजी; वाचा ‘आदिपुरुष’चा ट्विटर रिव्ह्यू
गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा होती, अखेर तो चित्रपट आज (16 जून) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हा चित्रपट त्यांना कसा वाटला, याविषयी प्रेक्षक ट्विट करत आहेत. या चित्रपटात रामायणाची कथा नव्या स्वरुपात मांडण्यात आली आहे. अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. जवळपास 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वांत महागडा मानला जातोय. पहिल्या शोनंतर या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
राघवच्या भूमिकेतील प्रभासचं अभिनय चाहत्यांना आवडलं असून पार्श्वसंगीताचं कौतुक अनेकांनी केलं आहे. तर काहींनी ओम राऊतच्या चित्रपटावर कमकुवत व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या भूमिकेवरून टीका केली आहे. ‘आदिपुरुष पाहताना माझ्या अंगावर शहारे आले. पार्श्वसंगीत उत्तर असून प्रभासचं अभिनय खूप चांगलं आहे. मात्र व्हीएफएक्स फारसं चांगलं नाही. त्यावर आणखी मेहनत घेता आली असती’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर ‘आदिपुरुषची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. बॅकग्राऊंड म्युझिक, व्हिज्युअल्स, ग्राफिक्स आणि युद्धाची दृश्ये अप्रतिम आहेत. प्रभास, क्रिती आणि सैफने उत्तम काम केलंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
#Adipurush Superb Film ? Full & Full Goosebumps Scenes With A Great BGM ? #Prabhas Acting Fantastic ? Other Castings Are Done Well ? Songs Are Big Plus ? VFX Is Not Good, This Movie Needs A Better VFX ? OVERALL A BLOCKBUSTER FILM ? pic.twitter.com/aOK3uYfEmm
— SaiKing ? (@SaiKingTweetz) June 16, 2023
#Adipurush Some movies shouldn’t be judged?but just be appreciated.Adipurush is that film for this modern world??Apart from the dragged second half,movie has enough goosebumps moments for fans Negatives:VFX is still half baked Positives :Screenplay,Music Rating :-4/5 ???? pic.twitter.com/qJ8L8xWeeP
— Film Buff ?? (@SsmbWorshipper) June 15, 2023
‘काही चित्रपटांवरून मतं बनवायची नसतात, त्यांचं फक्त कौतुक करावं. आदिपुरुष हा त्यापैकी एक आहे. सध्याच्या मॉर्डर्न युगासाठी बनलेल्या या चित्रपटातील बरीच दृश्ये अंगावर शहारे आणतात. व्हीएफएक्सचं काम अजूनही थोडंसं कच्चं वाटतं, मात्र संपूर्ण चित्रपट ब्लॉकबस्ट आहे’, असंही प्रेक्षकांनी लिहिलं आहे. एकंदरीत आदिपुरुषच्या व्हीएफएक्सवर प्रेक्षक काही प्रमाणात नाराज असल्याचं दिसून येत आहे. काहींनी सैफ अली खानचे फोटो शेअर करत त्यावरून टीका केली आहे.
#Adipurush Disappointed by 3rd class VFX ??? pic.twitter.com/tbUaSVnHh2
— Ahmed (FAN) (@AhmedSrkMan2) June 15, 2023
गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.