Aditya Ananya | आदित्य-अनन्याचा पोर्तुगालमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘तिथे तरी एकटं सोडा’

गेल्या वर्षी जेव्हा या दोघांनी एकत्र अभिनेत्री क्रिती सनॉनच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. मात्र दोघांनीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता फोटो व्हायरल झाल्यापासून काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Aditya Ananya | आदित्य-अनन्याचा पोर्तुगालमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले 'तिथे तरी एकटं सोडा'
Aditya Roy Kapur, Ananya Panday
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 8:58 PM

मुंबई | 18 जुलै 2023 : अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. हे दोघं सध्या पोर्तुगालमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्या या रोमँटिक व्हेकेशन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधी स्पेनमधील दोघांचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आदित्य आणि अनन्या एकमेकांच्या मिठीत दिसले. त्यानंतर पोर्तुगालच्या एका कॅफेमधील दोघांचा फोटो समोर आला. या फोटोमध्ये दोघांना एकमेकांच्या गप्पांमध्ये मग्न झाल्याचं पहायला मिळालं. आता आदित्य आणि अनन्याचा पोर्तुगालमधील रस्त्यावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिथल्या रस्त्यावर हे दोघं इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना दिसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत्याच. त्यावर दोघांनी मोकळेपणे कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्याचे थेट पुरावेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये आदित्य आणि अनन्या हे इलेक्ट्रिक स्कूटरवर पोर्तुगाल फिरताना दिसत आहेत. आदित्य त्याच्या स्कूटरवर पुढे जातो आणि अनन्यासाठी मागे वळून पाहतो. तेव्हा अनन्याला तिची स्कूटर चालवताना अडचण येत असल्याचं पहायला मिळतंय.

हे सुद्धा वाचा

आदित्य आणि अनन्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्या दोघांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, अशी विनंती नेटकरी करत आहेत. ‘पोर्तुगालमध्ये तरी त्यांना एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू द्या’, असं एकाने लिहिलं. तर ‘त्यांना तिथे तरी एकटं सोडा’ असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी या दोघांच्या वयातील अंतरावरूनही कमेंट्स केले आहेत. मात्र जर सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या वयातील 14 वर्षांचं अंतर योग्य वाटत असेल तर आदित्य आणि अनन्या यांच्यातील 15 वर्षांचं अंतर मोठं का वाटतंय, असाही सवाल काही चाहत्यांनी केला.

गेल्या वर्षी जेव्हा या दोघांनी एकत्र अभिनेत्री क्रिती सनॉनच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. मात्र दोघांनीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता फोटो व्हायरल झाल्यापासून काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी अनन्याची बाजू घेतली आहे. ती अभिनेत्री म्हणून कमकुवत असली तरी जोडीदार म्हणून उत्तम असेल, असं एकाने म्हटलं. तर आदित्यला अनन्यापेक्षा खूप चांगली मुलगी भेटू शकते, असं काहींनी म्हटलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.