कपूर कुटुंबातील आणखी एका लेकीचं प्रेम प्रकरण समोर; ‘या’ सेलिब्रिटीला करते डेट

जान्हवी कपूर हिच्यानंतर कपूर कुटुंबातील आणखी एक लेक प्रेमात, बॉयफ्रेंडला म्हणते 'लाईफ पार्टनर...'

कपूर कुटुंबातील आणखी एका लेकीचं प्रेम प्रकरण समोर; 'या' सेलिब्रिटीला करते डेट
कपूर कुटुंबातील आणखी एका लेकीचं प्रेम प्रकरण समोर; 'या' सेलिब्रिटीला करते डेट
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 11:00 AM

मुंबई : कपूर कुटुंबात सध्या प्रेमाचे वारे वाहत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या. अर्जुन आणि जान्हवीच्या नात्याची चर्चा जोर धरत असताना कपूर कुटुंबातील आणखी एका लेक प्रेमात असल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही, तर कपूरांची लेक बॉयफ्रेंडला लाईफ पार्टनर असल्याचं देखील सांगते. अभिनेते संजय कपूर आणि पत्नी माहीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

शनया कपूनने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, पण शनाया कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. २०२३ मध्ये शनाया तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. मीडियारिपोर्टनुसार, शनाया कायम तिच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री बॉय’सोबत असते. एवढंच नाही, तर अनेकदा ‘मिस्ट्री बॉय’ शनायासोबत पार्ट्यांमध्ये असतो.

शनाया मुंबईत राहणाऱ्या करण कोटहार्टला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप शनायाने तिच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. पण दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची ओळख लॉस एंजिलिस युनिव्हर्सिटीमध्ये झाली असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करण बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नाही. महत्त्वाचं म्हणजे शनायाने आतापर्यंत करणसोबत फोटो पोस्ट केलेला नाही. पण दोघांमध्ये बॉन्डिंग चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय दोघे अनेक ठिकाणी एकत्र जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

शनायाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ‘बेधडक’ सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. यासोबतच शनाया अभिनेता टायगर श्रॉफसोबत देखील सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.