Mohammed Shami : मोहम्मद शमीला लग्नाची मागणी घालणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; 7 विकेट्सवर म्हणाली..

विराट कोहलीच्या विक्रमी 50 व्या शतकानंतर मोहम्मद शमीने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळविला. या अभूतपूर्व कामगिरीनंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mohammed Shami : मोहम्मद शमीला लग्नाची मागणी घालणाऱ्या अभिनेत्रीची  पोस्ट चर्चेत; 7 विकेट्सवर म्हणाली..
Mohammed Shami Team india hero win onver new zealand
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 3:30 PM

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | वानखेडे स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विराट कोहलीच्या सेंच्युरीसह मोहम्मद शमीचा भेदक माराही निर्णायक ठरला. शमीच्या वेगवान माऱ्यासमोर न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. न्यूझीलंडचा डाव 327 धावांवर आटोपला आणि भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालं. या विजयानंतर सर्वत्र मोहम्मद शमीचं कौतुक होत आहे. अशातच एका अभिनेत्रीची शमीसाठीहीची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. कारण या अभिनेत्रीने शमीला चक्क लग्नाचीही मागणी घातली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने मोहम्मद शमीला लग्नाची मागणी घातली होती. ‘शमी तू तुझं इंग्रजी सुधार. मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे’, असं तिने म्हटलं होतं. त्यानंतर आता सेमीफायनलमधील शमीच्या अभूतपूर्व कामगिरीनंतर पायलने पुन्हा एकदा पोस्ट लिहिली आहे. संपूर्ण सामना सुरू असतानाही पायल सतत सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित होती. अखेर मॅच जिंकल्यानंतर तिने लिहिलं, ‘शमी यू ब्युटी.’ शमीने जेव्हा कॅच सोडली, तेव्हासुद्धा तिने पोस्ट लिहिली होती. ‘एकाच मॅचमध्ये शमीने सात विकेट्स घेतल्या, विश्वास बसत नाहीये’, असंही तिने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

पायलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आता तरी लग्न कर, इंग्लिश – विंग्लिशमध्ये काहीच राहिलं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता तुला शमीसोबत लग्न करायचं आहे की नाही’, असाही सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘शमी, लग्नासाठी तयार राहा’, असंही काहींनी म्हटलंय. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात सात विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक 23 विकेट्स मिळवणारा बॉलर ठरला आहे.

सेमी फायनलमधील शानदार कामगिरीमुळे मोहम्मद शमीला बुधवारी ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही देण्यात आला. भारताला मिळालेल्या विजयानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमीच्या नावाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या मोहम्मद शमी त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. पण काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होता. शमीची पत्नी हसीन जहाँ गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहत आहे. ‘भारतीय संघाला शुभेच्छा देईल पण, शमीला नाही…’ असं वक्तव्य शमी याच्या पत्नीने केलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.