Video | ‘चंद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगनंतर बाॅलिवूड कलाकारांचा जल्लोष, देशवासियांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले, हा क्षण आमच्यासाठी…
चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. संपूर्ण देशामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. बाॅलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद जाहिर केला आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
मुंबई : चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर (Chandrayaan 3 Landing) संपूर्ण देशात आनंद बघायला मिळत आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. देशाच्या कानाकोऱ्यात फक्त आणि फक्त आता जल्लोष हा बघायला मिळतोय. या एतिहासिक क्षणाचा साक्षीदार प्रत्येक भारतीयाला व्हायचे होते. चंद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या यशस्वी लँडिंगनंतर लोक शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
बाॅलिवूड स्टारमध्येही चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. बाॅलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर जल्लोष करताना अनिल कपूर हे दिसत आहेत. याचाच व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
अनिल कपूर या व्हिडीओमध्ये गॅलरीमध्ये बसलेले दिसत असून ते समोर स्क्रीनवर चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर टाळ्या वाजत आपला आनंद व्यक्त करत आहेत. बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन यानेही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कार्तिक आर्यन हा चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
View this post on Instagram
बाॅलिवूड अभिनेते आर माधवन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपला आनंद जाहिर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आर माधवन यांनी जय जय जय हिंद लिहिले आहे. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
आज संपूर्ण देशामध्ये चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. बाॅलिवूड कलाकारांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. परेश रावल यांनीही काही वेळापूर्वीच पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. आता या कलाकारांनी शेअर केलेल्या व्हिडीओंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.