Suhana Khan : पहिल्याच सिनेमात शाहरुख खान याच्या लेकीने ओलांडल्या सर्व मर्यादा! बिग बी यांच्या नातवासोबत…

Suhana Khan : 'द आर्चीज ' या पहिल्याच सिनेमात स्टारकिड्सने ओलांडल्या मर्यादा, शाहरुख खान याची लेक आणि अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा किसिंग सीन व्हायरल... सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीली म्हणाला... सर्वत्र चर्चांना उधाण...

Suhana Khan : पहिल्याच सिनेमात शाहरुख खान याच्या लेकीने ओलांडल्या सर्व मर्यादा! बिग बी यांच्या नातवासोबत...
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 9:51 AM

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून सतत ‘द आर्चीज’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘द आर्चीज’ सिनेमा 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच सिनेमात सुहाना खान हिने महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत किसिंग सीन दिले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्टारकिड्स यांच्या ‘द आर्चीज’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ‘द आर्चीज’ सिनेमातून सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाला असून, सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु असताना, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या समोर आले आहेत. एवढंच नाही तर, पहिल्याच सिनेमात किसिंग सीन देत शाहरुख खान याच्या लेकीने सर्व मर्यादा ओलांडल्या अशा देखील चर्चा रंगत आहेत.

सिनेमात सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांचा लिपलॉक सीन आहे. सिनेमात दोघांची रोमाँटीक केमिस्ट्री दिसत आहे. ‘द आर्चीज’ सिनेमात फक्त सुहाना खान, अगत्स्य नंदा यांनीच नाही खुशी कपूर हिने देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमात अगत्स्य याने फक्त सुहाना खान हिच्यासोबतच नाही तर, खुशी कपूर हिच्यासोबत देखील किसिंग सीन दिले आहेत.

सिनेमातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंट देखील करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खुशी कपूर, अगत्स्य नंदा, सुहाना कपूर, अदिती सहगल, युवराज मेंडा, मिहिर आहूजा आणि वेदांग रैना सिनेमाचं प्रमोशन करत आहेत.

‘द आर्चीज’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासून चर्चेत आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. सिनेमातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाबद्दल अपडेट देत होते. आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘द आर्चीज’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

सुहाना खान आणि अगत्स्य नंदा यांचं नातं

सुहाना खान आणि अगत्स्य नंदा एकमेकांना डेट करत आहेत.. अशा देखील चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही, सुहाना हिने वाढदिवस देखील अगत्स्य याच्यासोबत साजरा केला. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.