घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय हिचे ‘ते’ फोटो व्हायरल, अभिषेक बच्चन याच्याशिवाय..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सध्या ऐश्वर्या ही तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. विविध चर्चा सुरू आहेत.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय हिचे 'ते' फोटो व्हायरल, अभिषेक बच्चन याच्याशिवाय..
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 7:44 PM

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिषेक बच्चन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अभिषेक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन याच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर काही रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट झाला. गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या चर्चा असताना देखील यावर कोणीही भाष्य करताना दिसत नाहीये. ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडल्याचे देखील सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता नुकताच ऐश्वर्या राय हिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय ही भावाच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. यावेळी आराध्या देखील दिसत आहे.

नेहमीप्रमाणे या पार्टीला अभिषेक बच्चन हा अनुपस्थित आहे. सध्या अभिषेक बच्चन हा सध्या भोपाळमध्ये असल्याचे सांगितले जातंय. अभिषेक हा आजी इंदिरा भादुडी यांची काळजी घेतोय. अभिषेक बच्चन याच्या आजीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत खालावली असून आजीसोबत तो रूग्णालयातच आहे.

Aishwarya Rai

जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुडी यांचे निधन झाल्याची चर्चा होती. मात्र, आता हे स्पष्ट करण्यात आले की, सध्या त्या रूग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत स्थिर आहे. भोपाळमध्ये असल्यानेच अभिषेक बच्चन या बर्थडे पार्टीला उपस्थित नसल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले.

अमिताभ बच्चन यांनी त्याचा प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्यानेच बच्चन कुटुंबात वाद झाल्याचे सांगितले जातंय. यामुळेच ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती तिच्या आईच्या घरी मुलीसोबत शिफ्ट झालीये. मात्र, सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करताना दिसत नाहीये. हे बर्थडे पार्टीचे व्हायरल होणारे फोटो पाहून अनेकांनी अंदाज लावला की, घटस्फोटामुळेच अभिषेक हा बर्थडे पार्टीला पोहोचला नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.