ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटाची चर्चा, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल, चर्चांना उधाण

Abhishek Bachchan - Aishwarya Rai: लग्नाच्या 17 वर्षांनंतर अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय होणार विभक्त? घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिनेत्याने उचललं मोठं पाऊल, सर्वत्र चर्चांना उधाण

ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटाची चर्चा, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल, चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 10:03 AM

Abhishek Bachchan – Aishwarya Rai: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, अभिषेक याने घटस्फोटासंबंधी पोस्ट लाईक केल्यानंतर चर्चांना अधिक उधाण आलं. एवढंच नाही तर, मुलीसोबत कायम एकत्र दिसणारे ऐश्वर्या – अभिषेक आता एकत्र दिसत नाही. ऐश्वर्या – आराध्या यांना मात्र अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं जातं.

जेव्हा दुबई विमानतळावर ऐश्वर्या रायला स्पॉट करण्यात आलं तेव्हा अभिनेत्रीच्या हातात साखरपुड्याची अंगठी नव्हती. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. ऐश्वर्या हिच्याोसोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिषेक बच्चन याने जुहू याठिकाणी आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या शेजारीच अभिनेत्याने आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. ‘जलसा’ बंगल्याच्या भोवतीच बच्चन कुटुबियांचे पाच अपार्टमेंट आहेत. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की, अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली येथे असलेल्या ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 अपार्टमेंट खरेदी केले.

सध्या अभिषेक, पत्नी ऐश्वर्य, लेक आराध्या, आई – वडील जया बच्चन – अमिताभ बच्चन यांच्यासोबत जलसा बंगल्यात राहातो. जलसा बंगल्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय बच्चन कुटुंब देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

अभिषेक बच्चन याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेता ‘घूमर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला. सिनेमात अभिनेत्री सियामी आणि शबाना आजमी यांच्यासोबत झळकला. आता अभिषेक ‘बी हॅप्पी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सिनेमात अभिनेता एकट्या बापाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात इनायत वर्मा अभिनेत्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाचा पहिला पोस्टर मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. पोस्टर पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘एका एकट्या बापाची कहाणी… ज्याच्या मुलीला देशातील सर्वात मोठ्या डान्स रिॲलिटी शोमध्ये परफॉर्म करायचे आहे.’ असं लिहिलं होतं. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.