‘अशी वागणूक मिळत असेल तर..’; अमिताभ-अभिषेकवर भडकले ऐश्वर्या रायचे चाहते

अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकताच आपला 51 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चन आणि त्याच्या कुटुंबीयांकडून ऐश्वर्यासाठी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिण्यात आली नव्हती. यावरून ऐश्वर्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'अशी वागणूक मिळत असेल तर..'; अमिताभ-अभिषेकवर भडकले ऐश्वर्या रायचे चाहते
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 9:40 AM

अभिनेत्री ऐश्वर्या रायने 1 नोव्हेंबर रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त असंख्य चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांत ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांनी तिच्यासाठी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नाही. फक्त बिग बी आणि अभिषेकच नाही तर बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनीही ऐश्वर्यासाठी पोस्ट लिहिली नव्हती. यामुळे तिच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका रेडिट युजरने ऐश्वर्याचा अभिषेक, अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘अभिषेक बच्चन आणि कुटुंबीयांकडून ऐश्वर्याच्या 51 व्या वाढदिवशी कोणतीच पोस्ट नाही, घटस्फोट निश्चित?’

ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जर ऐश्वर्या नाखुश असेल तर तिला या नात्यातून बाहेर पडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अभिषेक बच्चनलाही त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दोघांनी परस्पर संमतीनेच निर्णय घेतला असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘जर हे सर्व खरं असेल तर मला ऐश्वर्यावर राग येऊ लागला आहे. जर तिला अशी वागणूक मिळत असेल तर तिने स्वत:साठी लढावं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘अभिषेकने पहिल्यांदाच तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. मुलगा आराध्यासोबतचा त्यांचा फोटो पोस्ट करत ‘हॅपी बर्थडे पा-दादाजी’ असं तिने लिहिलं होतं. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एक खास व्हिडीओ दाखवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबीयसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली नंदा हे सर्वजण या व्हिडीओमध्ये बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले होते. यासोबतच नात आराध्याचेही काही फोटो त्यात दाखवण्यात आले होते. मात्र या सर्वांत बिग बींची सून ऐश्वर्या राय कुठेच दिसली नव्हती. तेव्हाही अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.