Salman Khan: ‘मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं…’, सलमान खानचं मोठं वक्तव्य

Salman Khan - Aishwarya Rai: सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या नात्याला कोणाचा होता विरोध? मुलाखतीत भाईजान म्हणाला, 'मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं...', सलमान - ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा कायम असते रंगलेली...

Salman Khan: 'मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं...', सलमान खानचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 10:41 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही असं कोणीही नाही. आज दोघे देखील त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. असं असतानाही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एक काळ असा होता जेव्हा फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील दोघांच्या नात्याची चर्चा होती. रिपोर्टनुसार, सलमान खान याच्यासठी ऐश्वर्या हिने आई-वडिलांचं घर देखील सोडलं होतं. दोघांच्या नात्यातील हे सत्य फार कमी लोकांना माहिती आहे.

रिपोर्टनुसार, सलमान खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ऐश्वर्या हिने आई-वडिलांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. आई – वडिलांचं घर सोडल्यानंतर ऐश्वर्या हिने लोखंडवाला येथील गोरख हिल टॉव्हरमध्ये अपार्टमेंट घेवून राहाण्याचा निर्णय घेतला. त्याच अपार्टमेंटमध्ये ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यातील वाईट काळ सुरु झाला. ब्रेकअपनंतर संतापलेला सलमान खान मध्यरात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचला. पण अभिनेत्री दरवाजा उघडला नाही. रात्री 3 वाजेपर्यंत दोघांमध्ये भांडणं सुरु होती.

मोठ-मोठ्याने होत असलेली भांडणं पाहिल्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना बोलावलं. अखेर ऐश्वर्या हिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 2002 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत, ती घटना घडली होती.. असं अभिनेता म्हणाला होता.

मुलाखतीत सलमान खान म्हणाला होता की, ‘ऐश्वर्या आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो. प्रत्येक नात्यात भांडणं होतात. प्रेम होतं म्हणून भांडणं झाली. नात्यात प्रेम नसतं तर भांडणं झालीच नसती…’ यावेळी सलमान खान याने ऐश्वर्या हिच्या कुटुंबियांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘ऐश्वर्याचे कुटुंबिय फार चांगलं आहेत. माझ्या कुटुंबियांप्रमाणे तिचे कुटुंबिय देखील रुढीवादी आहेत…’

‘माझ्या भूतकाळाबद्दल ऐश्वर्याच्या कुटुंबियांना माहिती झालं होतं. म्हणून मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं… अशी त्यांची इच्छा नव्हती. माझी चुकी आहे. मला समजून जायला हवं होतं. मी त्यांच्या मुलीसोबत वाईट वागलो. तरी देखील त्यांनी त्यांच्या मुलीला मला भेटू दिलं…’ असं देखील सलमान खान मुलाखतीत म्हणाला.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने 16 नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत आराध्या अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.