Aishwarya Rai : ‘फक्त तुझ्यासाठी जगते…’, असं कोणाला म्हणाली ऐश्वर्या राय? खास व्यक्तीसोबत फोटो व्हायरल

Aishwarya Rai : अनेक वर्षांनंतर अखेर ऐश्वर्या राय व्यक्त झालीच... इन्स्टाग्रामवर आयुष्यातील खास व्यक्तीचा फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'फक्त तुझ्यासाठी जगते...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

Aishwarya Rai : 'फक्त तुझ्यासाठी जगते...', असं कोणाला म्हणाली ऐश्वर्या राय? खास व्यक्तीसोबत फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 9:13 AM

Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ऐश्वर्या आता अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सध्या ऐश्वर्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. शिवाय अभिनत्रीच्या आयुष्यात त्या व्यक्तीचं महत्त्व देखील फार मोठं आहे. ऐश्वर्या हिच्या आयुष्यातील खास व्यक्त दुसरी तिसरी कोणी नसून तिची लेक आराध्या बच्चन आहे.

आराध्या बच्चन हिचा वाढदिवस असल्यामुळे ऐश्वर्या हिने खास पोस्ट केली आहे. ऐश्वर्या हिने आराध्यासोबत खास फोटो पोस्ट केला आहे. आराध्या हिचा एक गोंडस फोटो पोस्ट करत ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये, ‘मी तुझ्यावर खूप…खूप प्रेम करते माझी एन्जल… तुला 12 व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी तुझ्यासाठी जगत आहे…’ असं ऐश्वर्या कॅप्शनमध्ये म्हणाली आहे..

फक्त ऐश्वर्या हिने नाहीच तर अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील लेक आराध्या हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक याने देखील आराध्या हिच्या लहानपणीचा गोंडस फोटो पोस्ट करत लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आराध्या हिला आई – वडिलांशिवाय अनेक सेलिब्रिटींनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चन हिची चर्चा आहे. आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक लोकप्रिय स्टारकिड आहे. सोशल मीडियावर आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट केलं जातं…

ऐश्वर्या राय हिचे सिनेमे

ऐश्वर्या हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘बता दें,’, ‘उमराव जान’, ‘गुरु’, ‘कुछ ना कहो ‘, ‘ऐ दिल हैं मुश्किल’, ‘दिल का रिश्ता’ यांसाऱ्या अनेक सिनेमांमध्ये ऐश्वर्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली. करियर यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीने आराध्या हिला जन्म दिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.