‘या’ अभिनेत्रीमुळे उद्ध्वस्त झाला असता काजोल – अजय यांचा संसार; एका निर्णयामुळे नाही तुटलं नातं
अजय - काजोल यांनी २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये केलं लग्न, पण अनेक वर्षांनंतर 'या' अभिनेत्रीमुळे सुखी संसारात आलं वादळ? मात्र काजोलने पतीला दिलेल्या धमकीनंतर...
मुंबई : अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) यांच्या नात्याबद्दल कायम चर्चेत असतात. चाहत्यांना देखील अजय आणि काजोल यांची जोडी फार आवडते. अजय आणि काजोल यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील आहे. सिनेमांमधील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये दोघांचं लग्न झालं. अजय आणि काजोल यांच्या लग्नाला आज अनेक वर्ष झाली आहेत. आज अजय आणि काजोल एकमेकांसोबत प्रचंड आनंदी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा अजय आणि काजोल यांच्या नात्यात अनेक चढ – उतार आले. पण काजोल हिने घेतलेल्या एका निर्णयामुळे अजय आणि काजोल याचं नातं टिकलं.
‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ सिनेमानंतर अजय आणि काजोल यांच्यात वाद होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मीडिया रिपोर्टनुसार,’वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ सिनेमा दरम्यान अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यामध्ये खास नातं तयार झाल्याच्या अनेक चर्चा रंगू लागल्या. कंगना रनौत हिच्यासोबत जेव्हा नात्याच्या चर्चा रंगू लागल्या तेव्हा अभिनेता विवाहित होता.
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री कंगना रनौत यांचं नातं इतकं पुढे गेलं होतं की, अभिनेत्याने कंगनाला अनेक सिनेमे मिळवून दिले. अजय याने कंगनाला ‘रास्कल’ आणि ‘तेज’ यांसारख्या सिनेमांमध्ये मदत केली. रिपोर्टनुसार, ‘तेज’ सिनेमात सर्वातआधी अभिनेत्री विद्या बालन हिला कास्ट करण्यात आलं होतं. पण अजयच्या निर्णयानंतर सिनेमात कंगनाची वर्णी लागली.
अजय देवगण आणि कंगना रनौत यांच्या नात्याबद्दल जेव्हा अभिनेत्री काजोल हिला कळालं, तेव्हा कंगनापासून लांब राहण्याचा सल्ला अभिनेत्रीने पती अजयला दिला. जेव्हा अजय देवगण आणि कंगना रनौत याच्या चर्चा सर्वत्र होवू लागल्या तेव्हा काजोल हिने पतीला मुलांसोबत घर सोडून जाण्याची धमकी दिली. अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे अजय आणि काजोल यांचं लग्न टिकलं.
नात्यात अनेक चढ – उतार आल्यानंतर अजय देवगण कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अनेकदा देवगण कुटुंबाला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येतं. अजय आणि काजोल यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे अजय आणि काजोल यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.