Nysa Devgn | ‘अजयने जरा जास्तच सूट दिली’; कपड्यांमुळे निसा देवगण ट्रोलर्सच्या निशाण्यावर

निसाने धिरुबाई अंबानी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलंय त्यानंतर ती सिंगापूरला पुढील शिक्षणासाठी गेली. निसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याबद्दल अद्याप काजोल किंवा अजयने कोणतंही स्पष्ट मत मांडलं नाही.

Nysa Devgn | 'अजयने जरा जास्तच सूट दिली'; कपड्यांमुळे निसा देवगण ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Nysa Devgn Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 1:34 PM

मुंबई : बॉलिवूडमधील काही स्टारकिड्स हे सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. नेटकऱ्यांमध्ये सतत चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्समध्ये अजय देवगण आणि काजोल यांच्या लाडक्या लेकीचं नाव नेहमीच अग्रस्थानी असतं. कोणतीही पार्टी असो किंवा डिनर डेट.. निसा देवगणचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. या फोटो आणि व्हिडीओंमुळे ती अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. निसाचे कपडे, तिची वागणूक किंवा कधी तिचं बोलणं यांवरून नेटकरी तिच्यावर टीका करताना दिसतात. नुकतीने तिने लंडनमध्ये प्रसिद्ध अमेरिकन गायिका बियॉन्सेच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा खास मित्र ओरहान अवत्रमणी, कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन, गायिका कनिका कपूर आणि इतर काही मित्रमैत्रिणी होत्या. या कॉन्सर्टमधील निसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल असून तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

‘अजय देवगणने त्याच्या मुलीला जरा जास्त सूट दिली आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘असे कपडे घालायचेच कशाला’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. याआधीही निसाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं गेलंय. गेल्या काही महिन्यांत निसा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. निसा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by FilmyKalakar (@filmykalakar)

निसाने धिरुबाई अंबानी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलंय त्यानंतर ती सिंगापूरला पुढील शिक्षणासाठी गेली. निसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याबद्दल अद्याप काजोल किंवा अजयने कोणतंही स्पष्ट मत मांडलं नाही. मात्र निसाला ज्या क्षेत्रात करिअर करायची आवड असेल त्या क्षेत्रात तिला करिअर करू देणार, असं अजयने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

एका मुलाखतीत अजय त्याच्या मुलांच्या ट्रोलिंगविषयीही व्यक्त झाला होता. “मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो. मला तर कधी कधी त्यांनी काय लिहिलंय हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे मला आता त्या गोष्टींचा काहीच त्रास होत नाही”, असं तो म्हणाला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.