प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःला संपवलं, निधनाआधी खोलीत १७ मिनिटं असणारा ‘मिस्ट्री मॅन’ कोण? मोठा खुलासा
पैसा, प्रसिद्धी असताना अभिनेत्रीने स्वतःला का संपवलं, निधनाआधी हॉटेलमध्ये तिच्यासोबत १७ मिनिटं असणाऱ्या त्या 'मिस्ट्री मॅन'बद्दल मोठा खुलासा...
मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने आपला जीव घेतला. अभिनेत्रीच्या निधनाप्रकरणी आकांक्षाच्या आईने बॉयफ्रेंड समर सिंह आणि भाऊ संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले असून दोघांवर तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत सर्वांसमोर हसत-खेळत असणाऱ्या आकांक्षाच्या मनात काय सुरु होतं याचा अंदाज कोणालाही आला नाही. तिच्या मनात नक्की काही तरी सुरु असावं असं चाहते म्हणत आहेत.
पार्टीमध्ये काय झालं ?
रिपोर्टनुसार, शनिवारी आकांशा दुबे मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेली होती. रात्री आठ वाजता तिने आईसोबत फोनवर संवाद साधला होता. शिवाय हॉटेलच्या खोलीतून अभिनेत्रीने एक रिल देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला . त्यानंतर अभिनेत्री पार्टीसाठी गेली. पार्टी संपल्यानंतर आकांक्षा रात्री १.५५ वा. दरम्यान हॉटेलमध्ये परतली. (akanksha dubey instagram)
१७ मिनिटं तिच्या खोलीत कोण होतं?
आकांक्षा हॉटेलमध्ये परतली तेव्हा तिला निट चालता येत नसल्याची माहिती हॉटेलमधील एका मॅनेजरने दिली. मॅनेजरने सांगितलं, तिला सोडण्यासाठी एक व्यक्ती आला होता. तिला चालता येत नव्हतं म्हणून त्याने अभिनेत्रीला तिच्या खोलीपर्यंत सोडलं. त्यानंतर १७ मिनिटांनी ती व्यक्ती बाहेर आली. अशात आकांक्षाला सोडण्यासाठी आलेला ‘मिस्ट्री मॅन’ कोण होता? याबद्दल चर्चा रंगत आहे.
आकांक्षाला सोडण्यासाठी आलेला ‘मिस्ट्री मॅन’ कोण होता? याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानूसार, ‘मध्यरात्री आकांक्षा हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आलेला व्यक्ती अभिनेत्रीच्या ओळखीचा होता. त्याने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं आहे.’ सध्या याप्रकरणी अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, आकांक्षा शनिवारी रात्री पांडेपूरमध्ये त्याला भेटली आणि लिफ्ट मागितली. म्हणूनच तो आकांक्षाला हॉटेलपर्यंत सोडायला आला होता. आकांक्षा दुबे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री होती. फार कमी वयात तिने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं होतं. (akanksha dubey phone number)
अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिवाय अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी आकांक्षा दुबे (akanksha dubey) ला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. मेरी जंग मेरा फैसला सिनेमातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.