Akshay Kumar | सेल्फी फ्लॉप झाल्यानंतर अक्षय कुमारला आणखी एक मोठा धक्का; आता अमेरिकेत..

अक्षय त्याच्या इतर सहकलाकारांसोबत अमेरिकेतील विविध ठिकाणी शूटसाठी जाणार होता. याच टूरच्या प्रमोशनसाठी तो नुकताच 'द कपिल शर्मा शो'मध्येही आला होता. मात्र न्यू जर्सीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Akshay Kumar | सेल्फी फ्लॉप झाल्यानंतर अक्षय कुमारला आणखी एक मोठा धक्का; आता अमेरिकेत..
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:11 AM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारसाठी मागचा काही काळ चांगला जात नाहीये. एकीकडे त्याच्या चित्रपटांना थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. त्यानंतर आता त्याला दुसरा मोठा धक्का बसला आहे. अक्षय कुमारच्या अमेरिकेत होणाऱ्या आगामी टूरविषयी निराशाजनक बातमी समोर येत आहे. अक्षय त्याच्या इतर सहकलाकारांसोबत अमेरिकेतील विविध ठिकाणी शूटसाठी जाणार होता. याच टूरच्या प्रमोशनसाठी तो नुकताच ‘द कपिल शर्मा शो’मध्येही आला होता. मात्र न्यू जर्सीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

टूरचं जोरदार प्रमोशन

अक्षय कुमारने नुकतेच त्याच्या या आगामी ‘टूर द एंटरटेनर्स’शी संबंधित अपटेड्स शेअर केले होते. मात्र या शोची न्यू जर्सीमधील तिकिटं विकलीजात नसल्याने तो रद्द करण्यात आल्याचं कळतंय. अक्षय कुमार, नोरा फतेही, दिशा पटानी, मौनी रॉय आणि सोनम बाजवा हे एकत्र ‘एंटरटेनर्स टूर’ या इंटरनॅशनल टूरला जाणार होते. गेल्या काही दिवसांपासून या टूरचं जोरदार प्रमोशन सुरू होतं.

रद्द होण्यामागचं कारण

आता या टूरच्या प्रमोटर्सने सांगितलं की 4 मार्च रोजी न्यू जर्सीमध्ये होणारा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. या कॉन्सर्टला यासाठी रद्द करण्यात आलं आहे, कारण अपेक्षेइतकी तिकिटं विकली गेली नाहीत. ‘कधी कधी परिस्थितीमुळे कठीण निर्णय घ्यावे लागतात’, असं स्पष्टीकरण प्रमोटर्सनी त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये दिलं आहे. यामध्ये त्यांनी चाहत्यांची माफीसुद्धा मागितली आहे. अमेरिकेतील बऱ्याच ठिकाणी हा शो होणार आहे. मात्र न्यू जर्सीमधील शो रद्द करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सेल्फी ठरला फ्लॉप

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला आहे. गेल्या 10 वर्षांत हा सर्वांत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. गेल्या वर्षांत अक्षयचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यापैकी एकाही चित्रपटाने विशेष कमाई केली नाही. रक्षा बंधन, राम सेतू, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. तर कटपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सेल्फी चित्रपटाची कमाई

शुक्रवार- 2.55 कोटी रुपये शनिवार- 3.80 कोटी रुपये रविवार- 3.95 कोटी रुपये एकूण- 10.30 कोटी रुपये

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.