AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी-टाऊनमधील सर्वात आवडती जोडी आहे. त्यामुळे ही दोन लव्हबर्ड्स सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आली आहेत. ही दोघं लव्हबर्डस असली तरी रणबीर कपूर आपल्या मित्रांसाठी लग्नाआदी बॅचलर पार्टी आयोजित करणार आहे.

आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार उडणार; 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघं लवकरच लग्नबंधनातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 2:00 AM
Share

मुंबईः आपल्या आजोबांची तब्बेत नाजूक असल्याच्या कारणामुळेच आलिया भट्ट (Alia Bhatt) आता आपल्या लग्नाच्या तारखेसाठी ती एप्रिल महिन्याचा विचार करत आहे. ई टाईम्सच्या मतानुसार आलिया आणि रणबीर कपूरच्या (Ranbeer Kapoor) जवळच्या सूत्राकडून समजले आहे की, दोघंही 17 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अलिया भट्टचे आजोबा एन. राजदान (N.Rajdan) यांची शेटवची इच्छा आहे की, आलिया आणि रणबीर कपूर या दोघांचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी गुपचूपपणेच 17 एप्रिल ही तारीख लग्नासाठी ठरवली आहे, आणि या लग्नात फक्त दोन्हीकडील कौटुंबीक सदस्यच फक्त लग्नाला हजेरी लावणार आहेत. हा विवाहसमारंभ आरके स्टुडिओमध्ये होणार असला तरी त्यासाठी अजूनपर्यंत तरी कोणतीही तयारी करण्यात आली नाही.

लग्नात फक्त जवळचेच नातेवाईक

रणबीर आणि आलिया ही दोघंही चेंबुरमधील आरके स्टुडिओच्या लॉजिस्टिक्सवर काम करत आहेत. लग्नातील प्रमुख पाहुण्यांची अजून तरी कोणतीही माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार लग्नासाठी पथक आणि मेहंदी विशेषज्ज्ञ वीणा नागदा यांच्याबरोबर संपर्क साधण्यात आला आहे. मात्र त्यांनी खुलासा केला आहे की, 1 एप्रिलच्या कार्यक्रमासाठी त्यांना कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. हा लग्न समारंभ म्हणजे दोन्ही कुटुंबातील हा एक छोटासा कार्यक्रम असणार आहे. या विवाह समारंभाचे आयोजन एक किंवा दोन दिवसांचेच असणार आहे, आणि त्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक तेवढेच सहभागी होणार आहेत.

बी-टाऊनमधील फेव्हरेट जोडी

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी-टाऊनमधील सर्वात आवडती जोडी आहे. त्यामुळे ही दोन लव्हबर्ड्स सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आली आहेत. ही दोघं लव्हबर्डस असली तरी रणबीर कपूर आपल्या मित्रांसाठी लग्नाआदी बॅचलर पार्टी आयोजित करणार आहे. रणबीर आणि आलिया त्यांच्या शूटिंगच्या शेड्यूलमधून वेळ काढून हे लग्न करणार आहेत. रणबीरच्या बॅचलर पार्टीत सहभागी होणाऱ्या सेलेब्रिटींची नावं समोर आली आहेत.

बॅचलर पार्टीतील मेहमान….

रणबीर, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्यासोबत पार्टीचे नियोजन करत आहे. रणबीरच्या या बॅचलर पार्टीत त्याच्या जवळचे मित्र आणि बालपणीचे दोस्त सहभागी होणार आहेत. लग्नानंतर मात्र ही दोन लव्हबर्डस आपापल्या शूटींगमध्ये व्यस्त राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

राज ठाकरे यांच्या ‘त्या’ भूमिकेमुळे मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्याची सोशल मिडियावर भावूक पोस्ट

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांना वेग, कामाच्या चित्रफिती सादर करणे कंत्राटदारांना बंधनकारक

भाजपच्या काळात मंदिराच्या अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.