Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt | बहीण असावी तर अशी! आलिया भट्टने शाहीनला दिले जुहूमधील दोन फ्लॅट्स

दुसरीकडे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं नवीन घरसुद्धा तयार होत आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हे दोघं घराचं काम कुठपर्यंत आलं, ते पाहण्यासाठी गेले होते. कृष्णराज बंगल्याच्या ठिकाणी आठ मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

Alia Bhatt | बहीण असावी तर अशी! आलिया भट्टने शाहीनला दिले जुहूमधील दोन फ्लॅट्स
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 10:30 AM

मुंबई : आलिया भट्ट ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवकरच ती हॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. इतकंच नव्हे तर ‘मेट गाला’ या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवरही ती पहिल्यांदाच झळकणार आहे. यशाच्या शिखरावर असलेल्या आलियाने नुकतंच मुंबईतील वांद्रे परिसरातील पाली हिल याठिकाणी अपार्टमेंट विकत घेतला आहे. इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या स्वत:च्या कंपनीद्वारे तिने या अपार्टमेंटमध्ये मोठी रक्कम गुंतवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने 2497 चौरस फुटांच्या अपार्टमेंटसाठी तब्बल 37.80 कोटी रुपये मोजले आहेत.

एप्रिल महिन्यात आलियाने प्रॉपर्टीमध्ये बरीच गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. पाली हिलमधल्या अपार्टमेंटसाठी तिने 2.26 कोटी रुपये स्टँप ड्युटीसाठी भरले आहेत. 10 एप्रिल रोजी तिने हा करार केला. याशिवाय तिने बहीण शाहीन भट्टला दोन अपार्टमेंट्स भेट म्हणून दिले आहेत. या दोन्ही अपार्टमेंट्सची किंमत जवळपास 7.68 कोटी रुपये असल्याचं कळतंय. या घरांचा करारसुद्धा 10 एप्रिल रोजीच झाला. 2,086 चौरस फूटांचे हे दोन्ही फ्लॅट्स जुहूमधील गिगी अपार्ट्समध्ये आहेत. यासाठी आलियाने 30.75 लाख रुपये स्टँप ड्युटीसाठी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

दुसरीकडे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं नवीन घरसुद्धा तयार होत आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हे दोघं घराचं काम कुठपर्यंत आलं, ते पाहण्यासाठी गेले होते. कृष्णराज बंगल्याच्या ठिकाणी आठ मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. ही संपूर्ण इमारत आलिया-रणबीरची असेल.

आलिया लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती गल गडॉट आणि जेमी डॉर्ननसोबत ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाची ऑफरसुद्धा तिने स्वीकारली आहे. यामध्ये ती प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.