Alia Bhatt | आलिया भट्ट हिची आजी किती ग्लॅमरस होती तुम्हाला महितीये? पाहा तिचे फोटो
आलिया भट्ट हिच्या आजीला पाहून तुम्हीही व्हाल थक्क... सोनी राजदान यांनी आईचे Unseen फोटो केले शेअर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या आजीच्या लूकची चर्चा...
मुंबई : ‘राझी’, ‘गंगुबाई काठियावाडी, ‘डियर झिंदगी’, ‘डार्लिंग्स’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री आलिया भट्ट हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज आलिया बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अव्वल स्थानी आहे. एकापेक्षा एक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका पार पाडत आलिया भट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. चाहत्यांना फक्त आलिया हिचं अभिनय आवडत नसून अभिनेत्रीचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे… आलिया तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे देखील कायम चर्चेत असते… एवढंच नाही तर, आलिया तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असते… आता देखील एका खास कारणामुळे आलिया भट्ट चर्चेत आली आहे..
आलिया भट्ट हिने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला.. अभिनेत्रीच्या लेकीचं नाव राहा कपूर असं आहे… आलिया स्वतः आई झाली असली तर अभिनेत्री सोनी राजदान यांच्यासोबत देखील आलियाचं नातं फार खास आहे.. आलियाला अनेक ठिकाणी आई सोनी राजदान यांच्यासोबत स्पॉट केलं जातं… तर सोनी राजदान यांचं आई गर्ट्रूड होल्ज़र (Gertrude Hoelzer) यांच्यासोबत प्रेमळ नातं आहे…
सोनी राजदान यांनी त्यांच्या आईचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आईचे फोटो शेअर करत सोनी राजदान यांनी त्यांच्या आईचा उल्लेख ‘रॉकस्टार’ म्हणून केला आहे.. फोटोंमध्ये आलिया भट्ट हिच्या आजीच्या ग्लॅमरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे… सध्या सर्वत्र आलिया भट्ट हिच्या आजीच्या फोटोंची चर्चा आहे…
View this post on Instagram
सोनी राजदान यांनी पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये आलियाच्या आजी एका दगडावर बसलेल्या दिसत आहेत.. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये प्रचंड सुंदर दिसत असून तिसऱ्या फोटोमध्ये आलियाच्या आजीच्या वेगळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे… सोनी राजदान यांनी पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत..
आलियाच्या आजी गर्ट्रूड होल्ज़र (Gertrude Hoelzer) ९४ वर्षांच्या आहेत… सोनी राजदान यांनी आईचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आई तू तेव्हा देखील रॉकस्टार होतीस आजही आहेस आणि कायम राहशील…’ सध्या आलिया भट्ट हिच्या आजीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चाचा विषय बनले आहेत…