Brahmastra on OTT: सबस्क्रिप्शनशिवाय पाहू शकता ‘ब्रह्मास्त्र’; कसं ते जाणून घ्या..
डिस्ने प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन नसतानाही पाहता येईल रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र'
मुंबई- रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ओटीटीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ब्रह्मास्त्र पाहण्यासाठी कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज लागणार नाही. सबस्क्रिप्शन नसतानाही ‘ब्रह्मास्त्र’ कसा पाहू शकतो, ते जाणून घेऊयात..
आलिया आणि रणबीरच्या ब्रह्मास्त्रची पहिली दहा मिनिटं तुम्ही मोफत पाहू शकता. या दहा मिनिटांसाठी प्रेक्षकांना डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज लागणार नाही. यासाठी फक्त त्यांना डिस्ने प्लस हॉटस्टार हा अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे. ही मोफत स्ट्रिमिंग आजपासूनच सुरू झाली आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
ब्रह्मास्त्र पाहण्यासाठी जे प्रेक्षक उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही दहा मिनिटं खास ठरणार आहेत. कारण याच दहा मिनिटांमध्ये प्रेक्षकांना ब्रह्मास्त्र चित्रपटातील महत्त्वपूर्ण सीन्स पहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अयानने अस्त्रांचं एक वेगळंच जग निर्माण केलं आहे.
दहा मिनिटांच्या या मोफत स्ट्रिमिंगमध्ये प्रेक्षकांना शाहरुख खानचा कॅमिओसुद्धा पहायला मिळणार आहे. त्यामुळे म्हणायला दहा मिनिटं जरी कमी वाटत असली तरी पुढचा चित्रपट पाहावा की पाहू नये हे ठरवण्यासाठी ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर आणि आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सर्वात महागडा हिंदी चित्रपट अशी ओळख ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने निर्माण केली आहे. या चित्रपटाचं बजेट तब्बल 410 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.