Alia Bhatt | ‘अत्यंत लज्जास्पद, एक महिला तिच्या घरातसुद्धा..’; आलियाच्या पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही फटकारलं

आलिया दुपारच्या वेळेस तिच्या लिव्हिंग रुममध्ये निवांत बसली होती, तेव्हा दोन अनोळखी लोक तिच्या समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून कॅमेराने सर्व शूट करत होते. आलियाच्या या पोस्टनंतर आता बॉलिवूडमधल्या इतर सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे.

Alia Bhatt | 'अत्यंत लज्जास्पद, एक महिला तिच्या घरातसुद्धा..'; आलियाच्या पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही फटकारलं
Alia Arjun and AnushkaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 9:25 AM

मुंबई : हल्ली एक महिला तिच्या स्वत:च्या घरातही सुरक्षित नाही, असं चित्र दिसतंय. अभिनेत्री आलिया भट्टसोबत नुकतीच अशी घटना घडली. या घटनेनंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राग व्यक्त केला. आलिया दुपारच्या वेळेस तिच्या लिव्हिंग रुममध्ये निवांत बसली होती, तेव्हा दोन अनोळखी लोक तिच्या समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून कॅमेराने सर्व शूट करत होते. आलियाच्या या पोस्टनंतर आता बॉलिवूडमधल्या इतर सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

माध्यमांनी पोस्ट केलेल्या फोटोंना टॅग करत आलियाने लिहिलं, ‘तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून दोन व्यक्ती माझ्याकडे कॅमेरा लावून पाहत होते. कोणत्या जगात हे असं करणं योग्य आहे?’

‘एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. एक अशी मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. आज मला हे म्हणावं लागतंय की सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत’, असं लिहित तिने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.

हे सुद्धा वाचा

अर्जुन कपूरचा पाठिंबा

अर्जुन कपूरने आलियाची पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘अत्यंत लज्जास्पद. ही एक अशी घटना आहे, ज्यात सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. एक महिला तिच्या स्वत:च्या घरातही सुरक्षित नाही. जे लोक सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करतात, त्यांनी अशा पद्धतीने मर्यादा ओलांडणं योग्य आहे का? याच लोकांवर आम्ही विश्वास ठेवतो की ते फोटो क्लिक करत आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की एखादी महिला तिच्या घरातच असुरक्षितपणा अनुभवू लागेल. मुंबई पोलिसांना मी हे सांगू इच्छितो की हे फक्त पाहणं नाही तर एखाद्या महिलेला स्टॉक करणं आहे.’

अनुष्का शर्मासुद्धा भडकली

अभिनेत्री अनुष्का शर्मानेही आलियाची बाजू घेतली. ‘ही काही पहिलीच वेळ नाही. जवळपास दोन वर्षांपूर्वी आम्हीसुद्धा या लोकांना अशाच पद्धतीने लपूनछपून फोटो काढताना पाहिलंय. त्यावेळी आम्ही त्यांना सुनावलं होतं. हे सर्व करून तुमचा सत्कार होईल असं तुम्हाला वाटतं का? अत्यंत लज्जास्पद घटना आहे ही. हे तेच लोक आहेत, ज्यांनी माझ्या मुलीचे फोटो पोस्ट केले होते. आम्ही स्पष्ट नकार दिल्यानंतरसुद्धा त्यांनी आमच्या खासगी आयुष्याचा आदर केला नाही’, अशा शब्दांत तिने फटकारलं.

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि आलियाची बहीण शाहीन भट्ट हिनेसुद्धा सोशल मीडियावर राग व्यक्त केला. “हे खूप वाईट आहे. या लोकांना मी अनेकदा नकार दिला, तरीसुद्धा ते परवानगीशिवाय शूट करतात. मी जिममध्ये असते, तेव्हा ते मला काचेतून बघत असतात आणि फोटो क्लिक करतात. काही जागा खासगी असतात. कमीत कमी तिथे तरी असं वागू नका”, असं जान्हवीने लिहिलं.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.