Tandav : अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक; सैफच्याही अडचणी वाढल्या
अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली वेब सीरिज ‘तांडव’ (Tandav) गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
मुंबई : अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली वेब सीरिज ‘तांडव’ (Tandav) गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तांडव वेब सीरिजच्या समस्या काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित नुकतीच लखनऊमध्ये आपले बयान नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्याच्यानंतर इलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.(Allahabad High Court rejects Aparna Purohit’s bail plea)
अटकपूर्व जामीन रद्द झाल्यामुळे अपर्णा पुरोहित यांना आता केव्हाही अटक होऊ शकते. आता बातमी अशीही आहे की, या प्रकरणात पोलिस वेब सीरिजमधील कलाकारांकडेही आपला मोर्चा वळू शकतात. यामुळे सैफ अली खानलाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अॅमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशु मेहरा आणि ‘तांडव’चे लेखक गौरव सोळंकी आणि अभिनेता मोहम्मद झिशान अयुब या सर्वांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
या तिन्ही याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपाठासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. आम्ही कलम 482 CrPC अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करु शकत नाही. त्यामुळे आम्ही अंतरिम संरक्षण बहाल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले होते.
या वेब सीरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. ‘तांडव’मधील एका दृश्यात ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला होता.
निर्मात्याने काय म्हटलं ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं होते.
संबंधित बातम्या :
Tiger 3 : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला फटका!
Video | करीनाच्या बाळाला भेटायला पोहोचली सारा अली खान, हातात दिसले भरपूर गिफ्ट्स…
(Allahabad High Court rejects Aparna Purohit’s bail plea)