Pushpa 2 संदर्भात अल्लू अर्जुनकडून महत्त्वपूर्ण माहिती लीक; चाहत्यांकडून एकच कल्ला!
अल्लू अर्जुनने दिली 'पुष्पा 2'मधील मोठी अपडेट; पहा Video
मुंबई- साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने 2021 या वर्षात सर्वाधिक कमाई केली. ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याची क्रेझ अद्यापही कायम आहे. चित्रपटातील ‘झुकेगा नहीं’ हा डायलॉग चांगलाच गाजला. प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा 2’च्या शूटिंगला सुरुवात झाली. या सीक्वेलबद्दल आता अल्लू अर्जुनने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनच्या तोंडी कोणता खास डायलॉग असेल, याचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने चाहत्यांसमोर ‘पुष्पा 2’मधल्या त्याच्या खास डायलॉगचा खुलासा केला. या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#PushpaTheRule Aslu Thaggedhele ??@alluarjun @PushpaMovie #Pushpa pic.twitter.com/W0Wz30n2SY
— TelanganaAlluArjunFC™ (@TelanganaAAFc) November 6, 2022
या व्हिडीओच्या सुरुवातीला चाहत्यांच्या गर्दीकडे पाहत अल्लू अर्जुन म्हणतो, “मला माहितीये, तुम्हा सर्वांना पुष्पा 2 संदर्भातील अपडेट जाणून घ्यायची आहे. माझ्याकडे छोटीशी अपडेट आहे.” हे ऐकताच उपस्थित चाहते आनंदाने एकच कल्ला करतात.
“पुष्पा 1 मध्ये माझा डायलॉग ‘झुकेगा नहीं’ असा होता. आता पुष्पा 2 मध्ये तो डायलॉग ‘बिल्कुल झुकेगा नहीं’ असा असेल. सर्वकाही सकारात्मक होईल अशी मला आशा आहे. मी या चित्रपटासाठी अत्यंत उत्साही आहे. असाच उत्साह तुम्हालाही असेल”, असं तो पुढे म्हणाला.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूकसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. ‘पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. पहिल्या भागाच्या अखेरीस फहाद हा या चित्रपटाचा मूळ खलनायक बनला होता.