Love Life | सुनेवर जडला बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाऊजी’चा जीव; असा झाला नात्याचा अंत

सुनेच्या प्रेमात असलेल्या ‘संस्कारी बाऊजी’ची 'या' कारणामुळे प्रेम कहाणी अधुरी... कसा झाला त्यांच्या नात्याचा अंत.. सध्या सर्वत्र आलोक नाथ यांच्या लव्हस्टोरीची चर्चा..

Love Life | सुनेवर जडला बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाऊजी’चा जीव; असा झाला नात्याचा अंत
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 10:56 AM

मुंबई : प्रेम…म्हणजे एक भावना असते. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते आणि त्या व्यक्तीबद्दल आपण सतत विचार करत असतो. बॉलिवूडमध्ये देखील असे अनेक प्रेम प्रेकरणं आहेत, जे आजही चर्चेत असतात. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांना अनेक सिनेमांमध्ये वडिलांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं. ‘हम आपके हैं कौन’आणि ‘हम साथ-साथ है’ या सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारल्यामुळे आलोक नाथ यांची ओळख बॉलिवूडचे ‘संस्कारी बाऊजी’म्हणून झाली. आलेक नाथ यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिकेला चाहत्यांकडून देखील प्रचंड प्रेम मिळालं. रुपेरी पडद्यावर वडिलांची भूमिका साकारणारे आलोक नाथ खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत राहिले.

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाऊजी’चा जीव चक्क सुनेवर जडला होता. जेव्हा आलोक नाथ ‘बुनियाद’ मालिकेत काम करत होते, तेव्हा अभिनेत्री नीना गुप्ता मालिकेत सुनेच्या भूमिकेत होत्या. एकत्र स्क्रिन शेअर करत असल्यामुळे त्यांचं नातं दिवसागणिक घट्ट होत होतं. पण आलोक नाथ आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी पूर्ण होवू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार; दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि मालिका संपण्याच्या आधीच दोघे वेगळे झाले. नीना गुप्ता दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे आलोक नाथ यांची प्रेम कहाणी पूर्ण होवू शकलं नाही. पण नीना गुप्ता आणि आलोक नाथ यांच्या नात्याची चर्चा तुफाण रंगली.

नीना गुप्ता यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर १९८७ साली आलोक नाथ यांनी आशु सिंग याच्यासोबत लग्न केलं. आलोक नाथ आणि आशु यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सांगायचं झालं तर आलोक नाथ यांनी त्यांच्या करियरची सुरुवात १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ सिनेमातून केली. त्यानंतर आलोक नाथ यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

नीना गुप्ता यांच्याबद्दल सांगायचं झालं, प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात नीना यांनी अनेक चढ – उतार पाहिले. अनेक मुलाखतींमध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पण आज नीना गुप्ता आनंदी आयुष्य जगत आहे. शिवाय ‘पंचायत’ या वेब सीरिजमुळे नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. नीना गुप्ता यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय नीना गुप्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.