संसारात वादळ… पण सानिया मिर्झा हिच्या एका पोस्टनं जिकलं; भारतीयांना अभिमान वाटावा अशी पोस्ट
sania mirza : पतीच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झा हिच्याकडे मुलाची जबाबदारी, खासगी आयुष्यात मोठं संकट, पण सानिया मिर्जाच्या एका पोस्टनं जिकलं भारतीयांचं मन... सर्वत्र सानिया मिर्झा हिच्या पोस्टची चर्चा
मुंबई | 26 जानेवारी 2024 : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, सानिया हिने 26 जानेवारी 202 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिन साजरा करत भारतीयांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतःचा एक खास फोटो पोस्ट करत सानिया हिने तिच्या मनातील भावना तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. सानिया हिने शेअर केलेल्या पोस्टची सध्या सर्वत्र तुफान चर्चा रंगल्या आहेत. सानिया हिने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत सानिया हिने देशासाठी खास कॅप्शन लिहिलं आहे.
सानिया हिने तिरंग्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आहे…’ असं लिहिलं आहे. सध्या सानिया हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. प्रोफेशनल आयुष्यात सानिया यशाच्या शिखरावर चढली, पण खासगी आयुष्यात सानिया हिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागत आहे.
Always an honour to represent our nation 🇮🇳#HappyRepublicDay ✨ pic.twitter.com/KGGpEySkqA
— Sania Mirza (@MirzaSania) January 26, 2024
नुकताच, सानिया हिचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली. एवढंच नाही तर, सानिया हिचा पहिला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक याने अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर शोएब याने तिसऱ्या पत्नीसोबत फोटो देखील पोस्ट केले.
सना हिचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर येताच, तिच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. शिवाय खुद्द सानिया हिने शोएब याला तिसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
सानिया हिने कधीच स्वतःचं खासगी आयुष्य चाहते किंवा सोशल मीडियावर येऊ दिलं नाही. रिपोर्टनुसार, सानिया हिने इस्लाममधील खुला पद्धतीत शोएब याला घटस्फोट दिला आहे. सध्या सानिया तिच्या मुलासोबत दुबई याठिकाणी राहत आहे. सानिया कायम सोशल मीडियावर मुलासोबत फोटो पोस्ट करत असते.
सानिया हिचा मुलगा सध्या पाच वर्षांचा आहे. शोएब याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया पुन्हा भारतात येईल का आणि तिचा मुलगा इजहान भारतातच करियर करेल का? यावर चर्चे रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिची सर्वत्र चर्चा रंगली आहे.