Gadar 2 | अमीषा पटेलने शेअर केला ‘गदर 2’चा स्पॉइलर; भडकलेले चाहते म्हणाले ‘आता क्लायमॅक्स पण सांगून टाक’

अमीषाच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'तू चित्रपटाचे स्पॉइलर्स का देत आहेस', असा सवाल एकाने केला. तर 'क्लायमॅक्स पण सांगून टाक. म्हणजे आम्ही चित्रपट थिएटरमध्ये पहायला जाणारच नाही', अशी उपरोधिक कमेंट दुसऱ्याने केली.

Gadar 2 | अमीषा पटेलने शेअर केला 'गदर 2'चा स्पॉइलर; भडकलेले चाहते म्हणाले 'आता क्लायमॅक्स पण सांगून टाक'
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 10:19 AM

मुंबई : जवळपास 22 वर्षांनंतर अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल हे ‘गदर 2’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘गदर’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षक या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. अखेर येत्या 11 ऑगस्ट रोजी ‘गदर 2’ प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर आणि आता त्यातील गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित केली जात आहेत. यादरम्यान अमीषा पटेलने असं काही केलं, जे पाहून प्रेक्षक फार नाराज झाले आहेत.

अमीषा पटेलने नेमकं काय केलं?

अमीषाने ‘गदर 2’ या चित्रपटातील एका सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यात तारा सिंग हा एका मृतदेहाजवळ बसून रडताना दिसून येतो. हा सीन पाहिल्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की सीक्वेलमध्ये सकीना या व्यक्तिरेखेचा मृत्यू होतो. चित्रपटाच्या याच महत्त्वाच्या सीनबद्दल अमीषाने हा खुलासा केला आहे. नेटकऱ्यांनी जेव्हा असा अंदाज वर्तवला की चित्रपटात सकीनाचा मृत्यू होतो, तेव्हा अमीषाने ट्विटरवर त्या सीनचा फोटो शेअर केला. या सीनसोबतच तिने माहिती दिली की चित्रपटात सकीनाचा मृत्यू होत नाही. ‘गदर 2’ या चित्रपटातील हा खूप मोठा स्पॉइलर आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

अमीषाच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘तू चित्रपटाचे स्पॉइलर्स का देत आहेस’, असा सवाल एकाने केला. तर ‘क्लायमॅक्स पण सांगून टाक. म्हणजे आम्ही चित्रपट थिएटरमध्ये पहायला जाणारच नाही’, अशी उपरोधिक कमेंट दुसऱ्याने केली. ‘तू हे चुकीचं करतेय, अशा पद्धतीने स्पॉइलर देऊन काय होणार’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

अमीषाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘माझे सर्व चाहते, तुमच्यापैकी बरेच जण हा विचार करून निराश होत आहेत की गदर 2 मध्ये सकीनाचा मृत्यू होणार आहे. पण तुम्ही असा विचार करू नका. कारण असं काहीच होणार नाही. तारा सिंग कोणाच्या मृतदेहाजवळ बसला होता, हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण इतकं नक्कीच सांगू शकते की ती सकीना नाही. त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. लव्ह यू ऑल.’

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.