‘सलमान खानचं लग्न होताना मी…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Bollywood Actress on Salman khan Marriage: सलमान खानच्या लग्नाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'सलमान खानचं लग्न होताना मी...', वयाच्या 49 व्या वर्षीही 'ती' अविवाहित, सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Bollywood Actress on Salman khan Marriage: अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आजही चाहते भाईजानच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. पण एक अभिनेत्री म्हणते, ‘सलमान खान याचं लग्न होताना मी पाहूच शकत नाही…’ सलमान खानच्या लग्नाबद्दल असं म्हणणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही अमीषा पटेल आहे. सांगायचं झालं तर, अमीषाचं देखील अनेकांसोबत नाव जोडण्यात आलं पण अभिनेत्री वयाच्या 49 व्या वर्षी देखील एकटीच आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अमीषा हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय आजू-बाजूच्या विवाहित लोकांचं आयुष्य पाहून अभिनेत्री प्रभावित होत असते. अमीषा म्हणाली, ‘मी माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे नातेसंबंध पाहिले आहेत. काही फार शातंतापूर्ण आहेत. जसं की अभिनेता संजय दत्त याचं…’
‘हृतिक रोशन जसा कसा ही असेल. त्याचा संसार मोडला आहे. पण सुझान आणि हृतिक एकत्र मिळून दोन मुलांचा सांभाळ करत आहेत. तो आजही माझा चांगला मित्र आहे. सलमान खान याच्याबद्दल बोलायचं झालं तर, त्याने लग्न करायलाच नको.’
View this post on Instagram
अमीषा पुढे म्हणाली, ‘एक चाहता मला म्हणाला होता, सलमान उत्तम व्यक्ती आहे. तुम्ही दोघे चांगले दिसता. दोघे लग्न करा. म्हणजे सुंदर मुलांना जन्म द्याल आणि मी देखील विचार करत होती. लग्न करण्याचे हे एक अतिशय खास कारण आहे. मला वाटतं जगाला सुंदर दिसणाऱ्यांना लोकं एकत्र पहायला आवडतात.’
‘कहो ना प्यार हे सिनेमानंतर हृतिक रोशनसोबत माझ्या नावाच्या चर्चा रंगल्या. पण हृतिकने सुझानसोबत लग्नाची घोषणा केल्यानतंर चाहत्यांना मोठा धक्का बसला.’ असं देखील अभिनेत्री नुकत्याच झालेल्या मुलाखतीत म्हणाली आहे. सध्या सर्वत्र अमीषाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
