Aamir Khan | ‘किरणसाठी वाईट वाटतंय’; डेटिंगच्या चर्चांदरम्यान आमिर खानचा ‘दंगल गर्ल’सोबतचा व्हिडीओ समोर

'मम्मी नंबर 3 लवकरच येणार आहे', असं एकाने लिहिलं. तर 'किरणसाठी वाईट वाटतंय', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'अच्छा तर हे खरंय' अशीही उपरोधिक प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली आहे.

Aamir Khan | 'किरणसाठी वाईट वाटतंय'; डेटिंगच्या चर्चांदरम्यान आमिर खानचा 'दंगल गर्ल'सोबतचा व्हिडीओ समोर
Aamir Khan and Fatima Sana ShaikhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 9:57 AM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने जेव्हा किरण रावसोबत घटस्फोट जाहीर केला, तेव्हा सोशल मीडियावर ‘दंगल’ या चित्रपटातील अभिनेत्री फातिमा सना शेख ट्रेंडमध्ये होती. फातिमामुळेच आमिरने किरणला घटस्फोट दिला, अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागल्या होत्या. इतकंच नव्हे तर खुद्द फातिमाने या चर्चांवर जुन्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा आमिर आणि फातिमाची जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे या दोघांचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आमिर आणि फातिमा हे मुंबईत पिकलबॉल हा खेळ खेळताना दिसले. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये आमिरने काळ्या रंगाची ट्रॅक पँट आणि लाल रंगाचा टी-शर्ट घातला आहे. तर फातिमाने राखाडी रंगाचा टी- शर्ट आणि काळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. हे दोघं एकाच बाजूने पिकलबॉल खेळताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून आमिरला ट्रोल केलं आहे. तर काहींनी त्याच्या खासगी आयुष्यात डोकावू नका, असा सल्ला पापाराझींना दिला आहे. ‘मम्मी नंबर 3 लवकरच येणार आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘किरणसाठी वाईट वाटतंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘अच्छा तर हे खरंय’ अशीही उपरोधिक प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली आहे.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

2021 मध्ये जेव्हा आमिर खान आणि किरण रावने त्यांचा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा फातिमाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. फातिमामुळेच या दोघांचं नातं तुटलं, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. 15 वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला होता. 2005 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. आमिर आणि किरण यांनी ज्यावेळी घटस्फोट जाहीर केला, त्यावेळी ट्विटरवर अचानक फातिमाचं नाव ट्रेंड होऊ लागलं होतं. ‘दंगल’ आणि ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांनंतर आमिर आणि फातिमा यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरजार चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळो या चर्चांना अफवा असल्याचं म्हणत नाकारलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.