सलमानसोबतचे व्हिडीओ व्हायरल होत असतानाच ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा; अखेर अभिषेकने दिलं उत्तर

कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमातील एका फोटोमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये दिसले. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या एकत्र कॅमेरासमोर पोझ दिसताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी हसत बोलतसुद्धा आहेत.

सलमानसोबतचे व्हिडीओ व्हायरल होत असतानाच ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा; अखेर अभिषेकने दिलं उत्तर
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 10:58 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्याने नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी ती मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. मात्र या दोघींसोबत अभिषेक कुठेच दिसला नाही. त्याआधीच्या एक-दोन कार्यक्रमात ऐश्वर्या एकटीच दिसल्याने घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. त्यातच सोशल मीडियावर सलमान खानसोबतचे ऐश्वर्याचे एडिट केलेले व्हिडीओ व्हायरल होऊ लागले होते. आता या सर्व चर्चांदरम्यान अखेर अभिषेक बच्चनने अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

सलमानसोबत ऐश्वर्याचे व्हिडीओ

अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण जितकं जगजाहीर होतं, तितकंच त्याचं ब्रेकअपसुद्धा. नात्यात कटुता आल्यानंतर हे दोघं पुन्हा कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. मात्र या दोघांना कधीही एकत्र पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी मोठा सरप्राईजच असतो. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमातील सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हे दोघं कधीच एकमेकांसमोर येणार नाहीत, हे चाहत्यांना चांगलंच माहीत आहे. मात्र तरीही असं कधी चुकूनही झालं तरी तो मोठा चर्चेचा विषय ठरतो. कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमातील एका फोटोमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये दिसले. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.

हे सुद्धा वाचा

यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या एकत्र कॅमेरासमोर पोझ दिसताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी हसत बोलतसुद्धा आहेत. मधेच ऐश्वर्या सलमानच्या कोटचं कॉलर ठीक करते आणि दोघं पुन्हा फोटोसाठी एकत्र पोझ देतात. सलमान खान आणि ऐश्वर्या रायला असं एकत्र पाहून चाहते खुश होत असेल तरी हा त्यांचा खरा व्हिडीओ नाही. हा एडिट केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हे एडिटिंग इतकं जबरदस्त आहे की खरंच हे दोघंं एकत्र आलेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला.

अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया

NMACC या कार्यक्रमातील ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो ट्विटरवर एका युजरने पोस्ट केला. ‘माझी आवडती लोकं’ असं कॅप्शन देत संबंधित युजरने हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. त्याच फोटोवर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझीसुद्धा (आवडती लोकं)’ अशी प्रतिक्रिया देत त्याने हृदयाचा इमोजी पोस्ट केला. त्यामुळे अभिषेकने अप्रत्यक्षपणे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.