Amitabh Bachchan यांनी माधुरी दीक्षितच्या अहंकाराला झटक्यात दाखवली योग्य जागा! तिचं नुकसान तर झालंच पण…

प्रसिद्ध अभिनेत्याची साथ सोडत माधुरीने अमिताभ बच्चन यांच्याकडे वळवला मोर्चा; पण अभिनेत्रीच्या अहंकाराला बिग बींनी दाखवली योग्य जागा...

Amitabh Bachchan यांनी माधुरी दीक्षितच्या अहंकाराला झटक्यात दाखवली योग्य जागा! तिचं नुकसान तर झालंच पण...
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 9:58 AM

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी असले तरी दोघांनी एकाही सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली नाही. माधुरी आता फार क्वचित एखाद्या सिनेमात दिसते. पण वयाच्या ८३ व्या वर्षी देखील बिग बी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आजही चाहते असतात. एवढंच नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखील अमिताभ बच्चन यांचे सिनेमे एक वेगळी उंची गाठतात. बिग ब यांनी अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली, पण माधुरी हिच्यासोबत बिग बी मोठ्या पडद्यावर कधीच रोमान्स आणि कॉमेडी करताना दिसले नाहीत. पण ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमातील ‘मेरे प्यार का रस जरा चखना, ओए मखना’ गाण्यात बिग बी आणि माधुरी एकत्र दिसले. त्यानंतर ही जोडी कधीही एकत्र दिसली नाही..

माधुरी दीक्षित हिच्याबद्दल सांगायचं झालं ९० च्या दशकात अभिनेत्री बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. माधुरी आणि अभिनेता अनिल कपूर यांची जोडी तेव्हा हीट ठरली होती. दोघांनी एकत्र ‘बेटा’, ‘तेजाब’, ‘हिफाजत’, ‘परिंदा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. याच सिनेमांमुळे माधुरीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली होती.

माधुरी आणि अनिल कपूर फक्त ऑनस्क्रिन नाही तर ऑफस्क्रिन देखील एकमेकांच्या फार जवळ आले होते. पण जेव्हा अनिल कपूरचे सिनेमे फ्लॉप ठरु लागले, तेव्हापासून माधुरीने अनिल कपूरसोबत सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं. त्यानंतर अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत संधीच्या शोधात अभिनेत्री होती. बिग बींसोबत काम करण्याची अभिनेत्रीला संधी देखील मिळाली.

हे सुद्धा वाचा

१९८८ साली दिग्दर्शत टीनू आमंद यांनी माधुरीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी दिली. पण दोघांचा सिनेमा कधीच प्रदर्शित होवू शकला नाही. रिपोर्टनुसार, दोघांनी आनंदाने सिनेमाची शुटिंग सुरु देखील केली. पण सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या तुलनेत आपली भूमिका प्रचंड साधी असल्याने माधुरी विरोध करत सिनेमाची स्क्रिप्ट बदलायला सांगत होती.

पण जेव्हा ही गोष्ट अमिताभ बच्चन यांनी कळाली तेव्हा बिग बींनी सिनेमाची शुटिंग बंद करण्यास सांगितलं. पण दिग्दर्शकाने सिनेमासाठी अधिक खर्च केल्यामुळे टीनू आनंद यासाठी विरोध करत होते. पण अखेर बिग बींनी सिनेमा विकत घेतला आणि सिनेमाचं शुटिंग कायमसाठी बंद केलं. हा पहिला आणि शेवटचा क्षण होता जेव्हा अमिताभ यांनी माधुरीसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.याच कारणामुळे अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित कधीही एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले नाही.

जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी.
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला.
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.