Amitabh Bachchan | जेव्हा पुरस्कार सोहळ्यात रेखा – जया बच्चन आल्या आमने – सामने; व्हिडीओ पहिल्यानंतर व्हाल थक्क
जेव्हा अमिताभ बच्चन यांची प्रेयसी आणि पत्नी आमने - सामने येतात, व्हिडीओ पहिल्यानंतर व्हाल थक्क; सध्या सर्वत्र रेखा आणि जया बच्चन यांची चर्चा...
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. अनेक वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे मार्ग वेगळे झाले असले तरी, आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात. शिवाय आजही त्यांच्या नात्याबद्दल देखील अनेक गोष्टी समोर येत असतात. पण रेखा, अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. अमिताभ यांच्यामुळे जया आणि रेखा यांच्यामध्ये कटूपणा आल्याच्या देखील अनेक चर्चा रंगल्या. जया आणि रेखा यांनी देखील काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या नात्याची चर्चा रंगू लागल्यामुळे जया आणि रेखा यांच्यातील मैत्री चाहत्यांमध्ये चर्चेत आली.
दरम्यान, अनेक ठिकाणी जया – रेखा एकत्र दिसल्या. एका पुरस्कार सोहळ्यात देखील जया आणि रेखा यांनी आमने – सामने आल्या. सध्या जया आणि रेखा यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघी एकमेकींना मिठी मारताना दिसल्या. जेव्हा दोघींनी एकमेकांनी मिठी मारली, तेव्हा चाहते देखील हैराण झाले. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, तो एका पुरस्कार सोहळ्यातील आहे.
View this post on Instagram
जया, रेखा आणि अमिताभ बच्चन या तिघांनी एकाच सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिलसिला सिनेमात तिघे एकत्र दिसले. जया, रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन लवकरच ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. तर जया बच्चन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक करण जोहर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सिनेमात आलिया – रणवीर यांच्यासोबत अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना अझमी झळकणार आहेत.
रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून रेखा बॉलिवूडपासून दूर आहेत. पण अनेक कारणांमुळे त्यांची चर्चा तुफान रंगलेली असते. अनेक कार्यक्रमांमध्ये रेखा यांना स्पॉट केलं जातं. वयाच्या ६८ वर्षी देखील रेखा यांचं सौंदर्य तरुणींना लाजवेल असं आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील रेखा यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.