Navya Naveli | अमिताभ बच्चन यांच्या नातीने सांगितला लग्नाचा प्लॅन; कोणाशी करणार लग्न?

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचं अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी नाव जोडलं गेलंय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नव्याने लग्नाविषयीचा तिचा प्लॅन सांगितला. त्याचसोबत ती सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयीही व्यक्त झाली.

Navya Naveli | अमिताभ बच्चन यांच्या नातीने सांगितला लग्नाचा प्लॅन; कोणाशी करणार लग्न?
नव्या नवेली नंदाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 3:38 PM

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा नेहमी तिच्या साधेपणामुळे आणि विनम्र स्वभावामुळे चर्चेत असते. नव्या ही बिग बींची मुलगी श्वेदा नंदाची लेक आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या इतर स्टारकिड्सपेक्षा ही खूपच वेगळी आहे. इंडस्ट्रीपासून दूर असली तरी नव्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नव्या तिच्या लग्नाबद्दल आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. निखिल कामथच्या ‘WTF is next Gen Thinking’ या शोमध्ये ती अभिनेत्री तारा सुतारियासोबत पोहोचली होती. या पॉडकास्ट मुलाखतीत तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

नव्या तिच्या लग्नाबद्दल म्हणाली, “मी नक्कीच लग्न करेन आणि माझी मुलंबाळंही असतील.” हाच प्रश्न जेव्हा तारा सुतारियाला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मलासुद्धा लग्न करायचं आहे.” याशिवाय नव्याला सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना कसा करतेस, असाही प्रश्न विचारण्यात आला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

या प्रश्नाचं उत्तर देताना नव्या पुढे म्हणाली, “मी जे काही करतेय, ते लोक जर पाहत असतील तर त्यामागे एक कारण हेसुद्धा आहे की मी कोणत्या कुटुंबातून आहे. दुसरं कारण म्हणजे मी माझ्यासाठी जे काही निवडलंय, ते मी मोकळेपणे करतेय. मला असं वाटतं की लोकांकडे नेहमीच बोलण्यासारखं काही ना काही असतं. त्यांना ऐकून घेण्यासाठी मी तयार आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल. आज मला लोक ओळखतात, यासाठी मी कृतज्ञ आहे.”

नव्या तिच्या रिलेशनशिपमुळेही अनेकदा चर्चेत येते. ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी तिचं नाव जोडलं जातं. या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली दिली नाही. मात्र सिद्धांत आणि नव्याला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांना गोव्याहून परत येताना पापाराझींनी पाहिलं होतं. त्यानंतर सिद्धांत आणि नव्या हे मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये मूव्ही डेटला एकत्र गेले होते. त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.