Amitabh Bachchan यांच्याकडे 35 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने, बँक बॅलन्स तर हैराण करणारं

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे गडगंज संपत्ती, आलिशान बंगला, कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, भारतातच नाही तर परदेशातील बँक बॅलन्स देखील थक्क करणारं... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगत आहे.

Amitabh Bachchan यांच्याकडे 35 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने, बँक बॅलन्स तर हैराण करणारं
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 10:17 AM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंज केलं. आजही बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहे. बिग बी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा अभिनय, डान्स, लूक महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या फॅशन सेन्सपुढे तरुण देखील फेल आहेत. बिग बी कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये चाहत्यांसमोर येत असतात. अमिताभ बच्चन यांना सोन्या-चांदीचे दागिने देखील प्रचंड आवडतात.

बिग बी यांच्याकडे एक दोन कोटी नाही तर, तब्बल ३५ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. एवढंच नाही तर, त्यांची पत्नी जया बच्चन यांच्याकडे देखील कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या बँक बॅलन्सबद्दल देखील तुम्हाला कदाचित माहिती नसेल..

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जया बच्चन राज्यसभेच्या खासदार आहेत. खासदारांना त्यांच्या मालमत्तेचा आणि जोडीदाराच्या संपत्तीचा तपशील द्यावा लागतो. यावरून 2018 मध्ये अमिताभ यांच्याकडे 35 कोटी रुपयांचे दागिने असल्याची माहिती समोर आली. आता त्यांच्याकडे किती सोने, किती चांदी आणि बँक बॅलन्सबद्दल जाणून घेवू…

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे किती मालमत्ता?

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी सोनं-चांदी प्रचंड आवडतं. अमिताभ बच्चन यांच्याकडे 2 कोटी रुपयांचे सोने आणि 5 कोटी रुपयांची चांदी आहे. तर त्यांच्याकडे एकून 28 कोटींचे दागिने आहेत. अशा प्रकारे, अमिताभ बच्चन यांनी सुमारे 35 कोटी रुपये सोनं-चांदीमध्ये गुंतवले आहेत.

जया बच्चन यांच्याकडे देखील २ कोटी रुपयांचे सोनं आहे. तर 89 लाख रुपयांची जया यांच्याकडे चांदी आहे. एवढंच नाही तर, 70 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा आणि 22 कोटी रुपयांचे दागिनेही जया बच्चन यांच्याकडे आहे. शिवाय अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे.

अमिताभ बच्चन यांनी पॅरिसच्या बँकेत पैसे गुंतवलेले आहेत. बिग बी यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. फ्रान्सच्या वेग-वेगळ्या बँकेत एकून 47,75,95,333 रुपये असल्याची माहिती मिळत आहे. तर रिपोर्टनुसार, बिग बी यांनी ४० कोटी रुपये मुंबई येथील एफडी बँक ऑफ इंडियामध्ये जमा केले आहेत.

जया बच्चन देखील 6,84,16,412 रुपयांच्या मालकीण आहेत. त्यांचे ६ कोटी रुपये दुबईच्या एचएसबीसी बँकेत जमा आहेत. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, बच्चन कुटुंब मुंबईतील जलसा या आलिशान बंगल्यात राहतं… सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.