‘या’ गंभीर आजाराच्या विळख्यात अडकले होते Amitabh Bachchan, डोळेही उघडता येत नव्हते
Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांना डोळेही उघडता येत नव्हते, शुटिंगच्या सेटवर अचनाक जमिनीवर कोसळले आणि गंभीर आजाराचं झालं निदान...खुद्द अमिताभ बच्चन यांनी केलं आजारावर मोठं वक्तव्य... चाहत्यांना सतावत होती बिग बी यांच्या प्रकृतीची चिंता...
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. बिगी बी यांच्यानंतर अनेक नव्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण कोणीही अभिताभ बच्चन यांची जागा घेवू शकलं नाही. आजही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने चाहत्यांचं मनोरंजन करतात. सध्या अमिताभ बच्चन ‘कोन बनेगा करोडपती 15’ या शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. एवढंच नाही तर, हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांसोबत बिग बी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगत असतात. नुकताच, बिग बी यांनी त्यांच्या गंभीर आजाराबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे चाहत्यांची देखील चिंता व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
‘कोन बनेगा करोडपती 15’ या शोमध्ये आलेल्या स्पर्धकाने त्याच्या आयुष्यात आलेल्या वाईट काळाबद्दल सांगितलं. ‘कोन बनेगा करोडपती 15’ या शोमध्ये आलेल्या स्पर्धकाचा अपघात झाला होता. अपघातामुळे स्पर्धक पॅराप्लेजिक झाला होता. अशात तो पूर्णपणे पत्नीवर निर्भर होता. स्पर्धकाच्या परिस्थितीवर भावुक होत, बिग बी यांनी त्यांच्या आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं. एक वेळ अशी आली हेती जेव्हा बिग बी यांना Myasthenia gravis नावाचा मसल डिसॉर्डर झाला होता. बिग म्हणाले, ‘एकदा शुटिंग करताना अचानक जमिनीवर पडलो. डॉक्टरांनी तपासनी केली तेव्हा मसल डिसॉर्डर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.’
पुढे बिगी म्हणाले, ‘मी स्वतःला पाणी पिवू शकत नव्हातो. कोटचे बटन मला लावता येत नव्हते. एवढंच नाही तर, मी स्वतःचे डोळे उघड – बंद देखील करू शकत नव्हतो. डॉक्टरांनी मला औषधं दिली होती आणि आराम करण्याचा सल्ला दिला होता. मी जेव्हा रुग्णालयातून घरी आलो, तेव्हा पुन्हा सिनेमात काम करु शकेल की नाही… याची भीती मला सतत सतावत होती. ती वेळ फार कठिण होती.’
‘मी घरी बसलो होतो, तेव्हा दिग्दर्शक मोहन देसाई मला भेटण्यासाठी घरी आले. त्यांच्यासोबत मी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ते मला म्हणाले, ‘तू बिलकूल घाबरु नकोस. व्हिलचेयरवर बसवून तुच्याकडून भूमिका बजावून घेईल..’ मी नाही सांगू शकत कोणी आपल्यासाठी एवढा विचार करु शकेल.. तेव्हा मला सपोर्टची खूप गरज होती’
‘कोन बनेगा करोडपती 15’ या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाच्या पत्नीचं देखील कौतुक केलं. म्हणाले, ‘कठीण परिस्थितीचा सामना करण्याची ताकद फक्त महिलांमध्ये असते. महिला कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. यामध्ये पुरुष मात्र मागे पडतात. मझ्या कठीण काळात देखील जया बच्चन यांनी माझी साथ दिली…’ असं देखील बिग बी म्हणाले.