सवत Kareena Kapoor सोबत कसं आहे अमृता सिंग हिचं नातं; सैफ – बेबोला एकत्र पाहिल्यानंतर भडकली अभिनेत्री!

करीना कपूर हिच्यामुळे तुटलं सैफ अली खान - अमृता सिंग यांचं नातं? अमृता आणि करीना एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.. कसं आहे दोघींमध्ये नातं?

सवत Kareena Kapoor सोबत कसं आहे अमृता सिंग हिचं नातं; सैफ - बेबोला एकत्र पाहिल्यानंतर भडकली अभिनेत्री!
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:57 AM

मुंबई : झगमगत्या विश्वात एक काळ असा होता, जेव्हा फक्त आणि फक्त अभिनेत्री अमृता सिंग हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. तेव्हा अमृतासोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि अभिनेते प्रतीक्षेत असायचे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात घर केलं. एकापेक्षा एक सिनेमे देणारी अमृता सिंग आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अमृता आज एकटी तिच्या दोन मुलांचं ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करते. अमृता सिंग हिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं, पण अभिनेता सैफ अली खान हिच्यासोबत अभिनेत्रीचं लग्न झालं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अमृता सिंग हिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्याने अभिनेत्री करिना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. सैफ आज पत्नी करीना आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सैफने करीनासोबत लग्न केल्यानंतर बेबो आणि अमृता यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. सैफ आणि करीनाला एकत्र पाहिल्यानंतर अमृता भडकली अशा अनेक चर्चा रंगल्या. तर आज अमृता आणि सैफ यांच्या नात्याबद्दल जाणून घेवू.

अमृता सिंग जेव्हा यशाच्या उच्च शिखरावर होती, तेव्हा अभिनेत्रीने १२ वर्ष लहान सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव सारा अली खान असं असून मुलाचं नाव इब्राहिम अली खान असं आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर सैफ आणि अमृता यांच्यामध्ये वाद सुरु झाले. अखेर दोघांनी २००४ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत नव्या घरात शिफ्ट झाली. त्यानंतर सैफ आणि करीना यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी २०१२ साली लग्न केलं.

सैफ आणि करीना यांच्यातील नात्यामुळे अमृता सिंग चांगलीच संतापली असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अमृताने एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी नाकारल्या आणि म्हणाली, ‘सैफ आणि करीना कपूरच्या नात्यामुळे मला कधीच अडचण आली नाही, जर असं असतं तर सैफच्या लग्नासाठ मुलांना कधीही तयार केलं नसतं.’

करीना आणि अमृता एकमेकांशी बोलत नाहीत, पण त्यांच्यात कधीही मतभेद किंवा वाद झाले नाहीत. कोणत्याही मुलाखतीत अमृता आणि करीना यांनी एकमेकींविरोधात वक्तव्य केलं नाही. अमृता सिंगची दोन्ही मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान देखील करिनाचा खूप आदर करतात. अनेक ठिकाणी सारा – इब्राहिम, करीना हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे.

सैफ आणि करीना यांच्या दोन मुलांसोबत देखील सारा – इब्राहिम यांचं खास नातं आहे. सारा, इब्राहिम, तैमूर, जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.