AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यासारखं लग्न केलं तर कानाखाली मारेन; अमृता सिंग मुलगी सारा अली खानबद्दल असं का म्हणाली?

अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अमृताने मुलीच्या लग्नाविषयी बेधडक वक्तव्य केलं होतं. माझ्यासारखं लग्न केलं तर तिच्या कानाखाली वाजवेन, असंच ती म्हणाली.

माझ्यासारखं लग्न केलं तर कानाखाली मारेन; अमृता सिंग मुलगी सारा अली खानबद्दल असं का म्हणाली?
अमृता सिंग, सारा अली खान, सैफ अली खानImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2023 | 9:34 AM
Share

मुंबई : 24 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. सैफशी घटस्फोट झाल्यानंतर अमृतानेच सारा आणि इब्राहिमला लहानाचं मोठं केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. 1991 मध्ये अमृताने सैफशी लग्न केलं आणि सर्वांसाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्यावेळी सैफकडे ‘कॅसानोव्हा’ म्हणून पाहिलं जायचं. अमृताच्या आधीही सैफच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. मात्र अमृताशी भेट झाल्यानंतर त्याने थेट लग्न करायचं ठरवलं होतं. या दोघांच्या वयात तब्बल 12 वर्षांचं अंतर होतं. मात्र त्याचाही सैफ-अमृताला काही फरक पडला नाही. या दोघांनी गुपचूप लग्न केलं. पण लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफ आणि अमृता विभक्त झाले. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अमृताने सारा अली खानच्या लग्नाविषयी बेधडक वक्तव्य केलं होतं. साराने माझ्यासारखंच लग्न केलं तर मी तिच्या कानशिलात लगावेन, असं थेट अमृता म्हणाली होती.

इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री रोझा कॅटालानोशी सैफशी जवळीक वाढल्यानंतर त्याच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र अमृताचा स्वभाव बदलला आणि कुटुंबीयांमुळे आमच्या नात्यात वितुष्ट आलं, असं सैफने स्पष्ट केलं होतं. लग्न आणि घटस्फोट यांविषयी अमृता आणि सैफची मुलगी सारा अली खान काही मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. “माझी आई हसणंच विसरली होती आणि ती तिच्या लग्नात खुश नव्हती. एकत्र राहून नाखुश असण्यापेक्षा विभक्त झालेलं बरं, असं तिला वाटलं. वडिलांना घटस्फोट देणं हा तिचा उत्तम निर्णय होता. आज इतक्या वर्षांनंतर दोघंही आपापल्या आयुष्यात खुश आहेत”, असं सारा म्हणाली होती.

एका मुलाखतीत अमृताने साराच्या लग्नाविषयी तिचं मत मांडलं होतं. “जर माझ्या मुलीने माझ्यासारखं गुपचूप लग्न करण्याची चूक केली तर मी तिला कानाखाली मारेन. माझ्या मुलांनी तीच चूक पुन्हा करावी अशी माझी अजिबात इच्छा नाही,” असं अमृता म्हणाली होती. घटस्फोटानंतर अमृताने दुसरं लग्न केलं नाही. मात्र सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्नगाठ बांधली. करीना आणि सैफला दोन मुलं आहेत.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.