करीना कपूर नाही तर, ‘या’ इटालियन मॉडेलमुळे सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट

'या' इटालियन मॉडेलमुळे सैफ आणि अमृता झाले विभक्त; काही वर्षांनंतर इटालियन गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं ब्रेकअप... त्यानंतर आयुष्यात झाली बेबोची एन्ट्री

करीना कपूर नाही तर, 'या' इटालियन मॉडेलमुळे सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 1:06 PM

Amrita Singh Saif Ali Khan Divorce : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) कायम त्याच्या खासगी आणि सिनेमांमुळे चर्चेत असतो. सैफ याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) हिच्यासोबत झालं होत. १९९१ सली सैफ आणि अमृता यांनी लग्न केलं. तेव्हा सैफ फक्त २१ वर्षांचा होता आणि बॉलिवूडमध्ये तेव्हा अभिनेता यशाच्या शिखरावर चढतच होता. तर ३३ वर्षीय अमृता सिंग प्रसिद्ध आणि बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक होती. दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. लग्नानंतर अमृता आणि सैफ यांना दोन मुलं देखील झाली पण दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Amrita Singh Saif Ali Khan Divorce)

अभिनेत्री करीना कपूर हिच्यामुळे सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या. पण सैफ आणि अमृता याचं घटस्फोट करीना कपूर नाही तर, एका इटालियन मॉडेलमुळे झालं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. लग्न झालेलं असताना सैफच्या आयुष्यात रोजा कॅटालानो नावाच्या इटालियन मॉडेलची एन्ट्री झाली होती. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगू लागल्या.

हे सुद्धा वाचा

अखेर तेरा वर्ष एकत्र राहिल्यानंतर सैफ अमृताने 2004 मध्ये घटस्फोट घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफच्या आयुष्यात रोजा कॅटालानो हिची एन्ट्री झाल्यानंतर अमृता सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) यांना वडिलांना भेटू देत नव्हती. दोघांमधील वाद प्रचंड पेटला होता.

अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर रोजा कॅटालानो आणि सैफ यांचं देखील ब्रेकअप झालं. त्यानंतर सैफ अली खान याच्या आयुष्यात करीना कपूर हिची एन्ट्री झाली. २००८ मध्ये ‘टशन’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सैफ आणि करीना यांच्यातील मैत्री वाढली. काही दिवसांनंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मिळालेल्या माहितीनूसार करीना आणि सैफ काही वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले.

त्यानंतर करीना आणि सैफ यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहेत. सैफ आणि करीना यांच्या मुलांचं नाव तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan). अमृताबद्दल सांगायचं झालं तर घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं नाही. सिंगल मदर म्हणून अमृताने सारा आणि इब्राहिम यांचा सांभाळ केला.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.