अमृता पेक्षाही सुंदर आहे आई, आजीसमोर फेल सारा, Unseen फोटो अखेर समोर
Amrita Singh Stylish Mother: अमृता हिच्या आईचा फोटो पाहून व्हाल थक्क, आजीच्या सौंदर्यासमोर सारा फेल, अमृता आणि आईचा अनसीन फोटो पाहून व्हाल थक्क..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अमृता सिंग हिच्या आईच्या सौंदर्याची चर्चा... फोटो तुफान व्हायरल
अभिनेता सैफ अली खान याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री अमृता सिंग आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अमृता सिंग – सैफ अली खान यांच्या नात्याचा अंत फार वर्षांपूर्वी झाला होता. पण आजही त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. पण आता अमृता सिंग – सैफ अली खान यांच्या नात्याबद्दल नाहीतर, अभिनेत्रीच्या आईची चर्चा रंगली आहे. सध्या अमृता हिचा आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आजीच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री सारा अली खान देखील फेल आहे. चाहते देखील फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
अमृता सिंग हिच्या आईचं नाव रुखसाना सुल्ताना (Rukhsana Sultana) असं आहे. रुखसाना यांचा सिनेमांसोबत काहीही संबंध नसला तरी राजकारणात त्यांचा खोलवर प्रभाव होता आणि एक वेळ अशी आली की लोक त्यांच्या नावाने घाबरू लागले होते.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर अमृता आणि आई रुखसाना सुल्ताना यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटो ब्लॅक एन्ड व्हाईट आहे. सध्या सर्वत्र आई रुखसाना सुल्ताना आणि लेक अमृता सिंग यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे….
अमृताच्या आई रुखसाना सुल्ताना…
सांगायचं झालं तर, रुखसाना सुल्ताना काँग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या फार जवळ होत्या. त्यानंतर संजय गंधी यांच्यासोबत देखील रुखसाना सुल्ताना राजकारणात सक्रिय झाल्या. रिपोर्टनुसार, आणीबाणीच्या काळात रुखसाना सुल्ताना यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गांधी यांनी रुखसाना सुल्ताना यांना 8 हजार मुस्लिम पुरुषांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली होती. पण रुखसाना यांनी 8 हजार नाही तर, तब्बल 13 हजार पुरुषांची नसबंदी केल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे तेव्हा अनेकांमध्ये रुखसाना सुल्ताना यांची भीती होती.
सांगायचं झालं तर, रुखसाना सुलताना हे दिल्लीतील जामा मशिदीजवळ राहणाऱ्या मुस्लिमांसाठी दहशतीचं दुसरं नाव बनलं होतं. रुखसाना सुलताना येणार असल्याचं सजताच पुरुष घाबरू लागले होते. रुखसाना यांना आणीबाणीची प्रमुख ग्लॅमर गर्ल म्हटलं जायचं.. आजही आणीबाणीच्या चर्चा लोकांमध्ये रंगलेल्या असतात…