‘मूड बना लिया’ गाण्यावर Amruta Fadnavis यांच्या लेकीची प्रतिक्रिया
'माझी लेक माझ्यावर...' ,‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच्या मुलीची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात. कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर परखड मत मात मांडत अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात असतात. पण आता अमृता फडणवीस कोणत्या वादग्रस्त मुद्द्यावरुन नाही, तर त्यांच्या नवीन गाण्यामुळे चर्चत आहेत. नुकताच अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा आहे. ६ जानेवारीला अमृता फडणवीस यांचं ‘आज मै मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित होताच काही क्षणात लोकप्रिय झालं. सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा सुरु आहे.
गाण्याच्या चर्चा सुरु असताना एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना गाणं प्रदर्शित झाल्यानंतर मुलीची प्रतिक्रिया काय होती असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मी कोणत्या ठिकाणी चूकत आहे, असं माझ्या मुलीला वाटत नाही. ती माझ्यावर प्रचंड प्रेम करते.’
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, ‘मला असं वाटतं माझ्या मुलीला माझ्या गाण्याच्या स्टेप देखील महिती आहेत. ती कायम घरात स्टेपवर डान्स करत असते…’ असं देखीस अमृता फडणवीस म्हणाल्या. सध्या अमृता फडणवीस त्यांच्या नव्या गाण्यामुळे तुफान चर्चेत आहेत.
दरम्यान, गाणं प्रदर्शित झाल्यानंतर, अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या हूकअप स्टेपवर रिल देखील बनवली आहे. शिवाय त्यांनी चाहत्यांना सुद्धा आव्हान दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ‘आज मै मूड बना लिया’ गाण्यावर हुकअप स्टेपवर रिल बनवण्यासाठी चाहत्यांना सांगितलं आहे.
शिवाय व्हिडीओ बनवल्यानंतर त्यांनी गाण्याचे हॅशटॅग देखील वापरण्यास सांगितलं आहे. अमृता फडणवीस यांची याआधी देखील आनेक गाणी प्रदर्शित झाले आहेत. बँकर असलेल्या अमृता कायम गायनाच्या माध्यमातून स्वतःची आवड जोपासताना दिसतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या गाण्यांची चर्चा कायम रंगलेली असते.