अमृता फडणवीस यांनी रिल स्टारसोबत धरला ‘तेरे नाल ही नचणा वे’ गाण्यावर ठेका

अमृता फडणवीस अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे नवीन गाणंसुद्धा प्रचंड हीट ठरलं आहे.

अमृता फडणवीस यांनी रिल स्टारसोबत धरला 'तेरे नाल ही नचणा वे' गाण्यावर ठेका
अमृता फडणवीस यांनी रिल स्टारसोबत धरला 'तेरे नाल ही नचणा वे' गाण्यावर ठेका
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 2:18 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात. नुकताच अमृता फडणवीस यांचं ‘आज मुड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला. अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर रिल तयार केलं आहे.

रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ खुद्द अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या नव्या रिलची चर्चा आहे. ‘आज मूज बना लिया’ रिल तयार करत अमृता फडणवीस यांनी ‘आज मूज बना लिया’ गाणं पाहण्यासाठी सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.

View this post on Instagram

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)

अमृता फडणवीस अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे नवीन गाणंसुद्धा प्रचंड हीट ठरलं आहे. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

अमृता फडणवीस यांची याआधी देखील आनेक गाणी प्रदर्शित झाले आहेत. बँकर असलेल्या अमृता कायम गायनाच्या माध्यमातून स्वतःची आवड जोपासताना दिसतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या गाण्यांची चर्चा कायम रंगलेली असते. अनेकदा त्यांना त्यांच्या आवडीमुळे ट्रोल देखील करण्यात आलं. पण कोणत्याही गोष्टकडे लक्ष न देता अमृता फडणवीस कायम स्वतःची आवडत जपताना दिसतात.

‘आज मूज बना लिया’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची काय प्रतिक्रिया होती याबद्दल देखील सांगितलं. ‘मी कोणत्या ठिकाणी चूकत आहे, असं माझ्या मुलीला वाटत नाही. ती माझ्यावर प्रचंड प्रेम करते.’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, ‘मला असं वाटतं माझ्या मुलीला माझ्या गाण्याच्या स्टेप देखील महिती आहेत. ती कायम घरात स्टेपवर डान्स करत असते…’ असं देखीस अमृता फडणवीस म्हणाल्या. सध्या अमृता फडणवीस त्यांच्या नव्या गाण्यामुळे तुफान चर्चेत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.