अमृता फडणवीसांचे शिव तांडव स्त्रोत्र येतय; सोशल मीडियावर शेअर केला संगीतमय अनुभव

अमृता फडणवीस आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या शिव तांडव स्त्रोत्र या गाण्यांच्या अल्बममुळे. शिव तांडव स्त्रोत्र या गाण्याचा अल्बम गुरुवारी 24 रिलीज होत आहे, त्या अल्बमचे त्यांनी पोस्टर ट्विटर आणि फेसबुकवरून शेअर केल्यामुळे त्या सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.

अमृता फडणवीसांचे शिव तांडव स्त्रोत्र येतय; सोशल मीडियावर शेअर केला संगीतमय अनुभव
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:59 PM

मुंंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची पत्नी म्हणून अशी ओळखल असली तरी त्यांचा सांस्कृतिक क्षेत्रात वावर असल्यामुळे त्यांची एक गायिका म्हणून ओळख आहे. अमृता फडणवीस यांनी मोजकीच गाणी (Songs) गायिली असली तरी त्यांचं आलेलं कोणतंही गाणं असले तरी सगळा सोशल मीडिया नंतर अमृता फडणवीसांच्या गाण्यांनी अमृतमय होऊन जातो. सोशल मीडियावर कधी त्यांचं गाणं येणार म्हणून त्यांच्या ट्विटसला हजारोंनी मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चर्चेत असतात नाहीतर तर कोणत्यातही त्यांच्या ट्विटमुळे. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या त्या त्यांच्या शिव तांडव स्त्रोत्र या गाण्यांच्या अल्बममुळेय. शिव तांडव स्त्रोत्र या गाण्याचा अल्बम गुरुवारी 24 रिलीज होत आहे, त्या अल्बमचे त्यांनी पोस्टर ट्विटर आणि फेसबुकवरून शेअर केल्यामुळे त्या सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.

अमृता फडणवीस यांनी याआधीही आपल्या गायिकीतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे गाणे आले की, दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आलेल्या असतात. तर काही प्रतिक्रियांना तेवढ्याच सहजतेने त्या उत्तरही देत असतात. आता नुकताच त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून आगामी शिव तांडव स्त्रोत्र या अल्बमचे पोस्टर शेअर केले आहे. शिव तांडव स्त्रोत्र हा संगीतमय अल्बम शैलेश दाणी आणि व्हिडिओ निर्मिती रवी जाधव यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांच्यासोबत गौरी यादवाडकर यांचाही सहभाग आहे. दैवी संगीतमय अनुभव

शिव तांडव स्त्रोत्रचे पोस्टर शेअर करताना त्यांनी वेगळा अनुभव असल्याचे सांगत हा व्हिडिओ अल्बम म्हणजे भक्तीमुळे झालेला हा आकर्षक अध्यात्मिक प्रवास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात दैवी संगीतमय अनुभव असल्याचे सांगत त्यांच्या सहकार्यांचीही त्यांनी माहिती शेअर केली आहे.

शिव तांडव स्त्रोत्राची उत्सुकता

अमृता फडणवीस यांच्या शिव तांडव स्त्रोत्र या त्यांच्या गाण्याचे पोस्टर ज्या वेळी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा काही कालावधीतच त्यांच्या या पोस्टला नेटिझन्सकडून अभिनंदनाच्या प्रतिक्रिया आल्या तर अनेक जणांनी गाण्याची आपल्याला उत्सुकता असल्याचे सांगत अमृता फडणवीस यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. आता अनेक नेटिझन्सना 24 तारखेची प्रतीक्षा आहे, ते फक्त अमृता फडणवीस यांच्या शिव तांडव स्त्रोत्राची.

संंबंधित बातम्या

जॉन अब्राहमचा पुन्हा एक अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला ; तेहरानचे पोस्टर शेअर करुन म्हणाला मी…

कच्चा बदामच्या Reelनं फेमस झाली अंजली अरोरा! तिचा नवा Reel आलाय, पाहून म्हणाल, ‘आ रा रा रा….’

‘गंगुबाई काठियावाडी’च्या विरोधात कामाठीपुराचे रहिवाशी; हायकोर्टात दाखल केली याचिका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.