राधिका मर्चंटच्या हातावर लागली अनंत अंबानी यांच्या नावाची मेहंदी; व्हिडीओ व्हायरल

राधिका मर्चेंट लवकरच होणार सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सून; मेंहदी सोहळ्यातील व्हिडीओ पाहून तुम्हीही अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेचं कराल कौतुक

राधिका मर्चंटच्या हातावर लागली अनंत अंबानी यांच्या नावाची मेहंदी; व्हिडीओ व्हायरल
राधिका मर्चंटच्या हातावर लागली अनंत अंबानी यांच्या नावाची मेहंदी; व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 8:42 AM

मुंबई : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे लहान पूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा नुकताच मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. आता अनंत आणि राधिका दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अनंत आणि राधिका यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राधिका यांच्या हातावर अनंद अंबानी यांच्या नावाची मेंहदी लागली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, मेंहदी सोहळ्यात राधिका यांच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं. स्वतःच्या मेंहदीमध्ये राधिका यांनी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या ‘घर मोरे परदेसीया’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. राधिका यांनी बॉलिवूड गाण्यावर केलेल्या डान्समुळे प्रत्येकाने अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेचं कौतुक केलं. आकाश अंबानी फॅन पेजवरुन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.

मेहंदी सोहळ्यातील राधिका यांचा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यावर असलेल्या फ्लोरल एम्ब्रॉएडर्ड लेहंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिवाय राधिका यांनी घातलेल्या दागिन्यांची चर्चा देखील तुफान रंगत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

कोण आहे राधिका मर्चंट

राधिका प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट यांची कन्या आहे. राधिकाने परदेशातून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. राधिका एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामिल आहे. राधिकाच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर राधिका यांच्याकडे जवळपास १० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

राधिकाच्या वडिलांकडे जवळपास ७५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील विरेन मर्चंट देखील भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंबानी कुटुंबाची सून झाल्यानंतर राधिकाच्या संपत्तीत आणखी वाढ होईल. वडिलांच्या संपत्तीची राधिका एकटी वारसदार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.