Ananya Panday | बहिणीच्या मेहंदी कार्यक्रमात अनन्या पांडे ‘हे’ काय करत होती? नको तो फोटो व्हायरल

लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी या दोघांनी एकत्र रॅम्प वॉक केला होता. त्यानंतर अनन्याने सोशल मीडियावर आदित्यसोबतचे फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

Ananya Panday | बहिणीच्या मेहंदी कार्यक्रमात अनन्या पांडे 'हे' काय करत होती? नको तो फोटो व्हायरल
Ananya PandayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 11:34 AM

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आधी अफेअरमुळे आणि आता बहिणीच्या मेहंदी कार्यक्रमातील एका फोटोमधील ती चर्चेचा विषय ठरली आहे. नुकताच लॅक्मे फॅशन वीक पार पडला. यावेळी अनन्याने अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत रॅम्प वॉक केला. अनन्या आणि आदित्यच्या अफेअरच्या चर्चा आधीपासूनच होत्या. मात्र जेव्हा हे दोघं शॉ-स्टॉपर म्हणून रॅम्पवर एकत्र आले, तेव्हा चर्चांना आणखी उधाण आलं. आता अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे हिच्या मेहंदी कार्यक्रमातील एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेचे चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी अलाना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रे यांच्याशी ती लग्न करणार आहे. नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये अनन्या स्मोकिंग करताना दिसत आहे. बहिणीच्या मेहंदी कार्यक्रमातील पाहुण्यांचा हा फोटो होता. या पाहुण्यांमध्ये उभी असलेली अनन्या सिगारेट पिताना दिसत आहे. मात्र ज्या अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला होता, तो काही वेळाने डिलिट करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

अनन्याचा स्मोकिंग करतानाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘अनन्या स्मोकर असेल अशी अपेक्षा नव्हती’ असं एकाने लिहिलंय. तर ‘यांना फक्त कूल दिसायचं असतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘आरोग्याबद्दल इतकी सजग असणाऱ्या अनन्याला स्मोकिंग करताना पाहून आश्चर्य वाटतंय. कदाचित वजन कमी ठेवण्यासाठी ती हे करत असावी का?’ असाही सवाल नेटकऱ्याने केला आहे.

पहा व्हिडीओ-

गेल्या काही दिवसांपासून अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जात आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी या दोघांनी एकत्र रॅम्प वॉक केला होता. त्यानंतर अनन्याने सोशल मीडियावर आदित्यसोबतचे फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. मात्र या अफेअरच्या चर्चांवर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.