AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनन्या पांडे हिने थेट सांगितले लग्नाबद्दलचे नियोजन, आदित्य रॉय कपूर याच्यासोबतच…

अनन्या पांडे ही नेहमीच चर्चेत असते. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहेत. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट देखील होतात. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तगडी फॅन फाॅलोइंग यांची बघायला मिळते.

अनन्या पांडे हिने थेट सांगितले लग्नाबद्दलचे नियोजन, आदित्य रॉय कपूर याच्यासोबतच...
Aditya Roy Kapur, Ananya Panday
| Updated on: Jun 30, 2023 | 2:56 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट (Movie) रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. अनन्या पांडे ही लाईगर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. या चित्रपटात साऊथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा देखील मुख्य भूमिकेत होता. मात्र, लाईगर चित्रपट फ्लाॅप गेला. लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर शेवटी अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले. लाईगर चित्रपटानंतर अनन्या पांडे आपल्या फिसमध्ये मोठी वाढ करणार होती.

लाईगर चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनन्या पांडे हिला अनेक चित्रपटांच्या आॅफर या सातत्याने येत होत्या. मात्र, जसाही लाईगर चित्रपट फ्लाॅप गेला आणि चित्रपट निर्मात्यांनी अनन्या पांडे हिच्याकडे पाठ फिरवली. लाईगर हा बिग बजेटचा चित्रपट होता. अनेकांनी लाईगर चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अनन्या पांडे हिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, अनन्या पांडे ही बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. बऱ्याच पार्ट्यांमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे सोबत दाखल होतात. इतकेच नाही तर अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे हिने आदित्य रॉय कपूर याच्यासोबत एक खास फोटोशूट देखील केले होते.

आदित्य रॉय कपूर याच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनन्या पांडे हिने आपल्या लग्नाचे प्लॅनिंग थेट सांगितले आहे. अनन्या पांडे म्हणाली की, मुळात म्हणजे माझे खूप कमी वय हे लग्न करण्यासाठी आहे. पुढे अनन्या म्हणाली की, मी अजून लग्नाचे काहीच प्लॅनिंग केले नाहीये. आता माझे वय हे लग्नासाठीचे योग्य वयच नाहीये.

अनन्या पांडे ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे दिल्लीमध्ये शूटिंग करत आहे. ड्रीमगर्ल 2 चित्रपटात अनन्या पांडे ही आयुष्मान खुराना याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अचानक ड्रीमगर्ल 2 चित्रपटात अनन्या पांडे ही महत्वाच्या भूमिकेत असल्याचे जाहिर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नुसरतचा पत्ता अनन्या पांडे हिच्यासोबत चित्रपटातून कट झालाय. यावर काही दिवसांपूर्वी नुसरतने मोठे भाष्य केले होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.