लग्नाआधी ७५ महिलांना डेट केलय ‘या’ अभिनेत्याने ; नोरा फतेही हिच्यासोबत नाव जोडल्यानंतर…

तब्बल ७५ महिलांना डेट केल्यानंतर 'या' अभिनेत्याने केलं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न; आता आहे दोन मुलांचा वडील, पण नोरा फतेही हिच्यासोबत नाव जोडल्यानंतर अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

लग्नाआधी ७५ महिलांना डेट केलय 'या' अभिनेत्याने ; नोरा फतेही हिच्यासोबत नाव जोडल्यानंतर...
लग्नाआधी ७५ महिलांना डेट केलय 'या' अभिनेत्याने ; नोरा फतेही हिच्यासोबत नाव जोडल्यानंतर...
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 1:58 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात काय घडत आहे किंवा त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे… यासर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. काही सेलिब्रिटी त्यांचं खासगी आयुष्य प्रचंड गुपित ठेवतात, तर काही मात्र अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अंगद बेदी. अंगद याला कलाविश्वात अपयश मिळालं, पण अभिनेता खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होता. अभिनेत्याने चक्क ७५ महिलांना डेट केलं होतं… याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत केला होता. अंगद याचं नाव अभिनेत्रा नोरा फतेही हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

एका मुलाखतीत अंगद याला ‘खिलाडी’ म्हणून हाक मारली आणि अभिनेत्याला त्याच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं, तेव्हा अंगद सुरुवातील अडखळत म्हणाला, ‘७५ महिलांना डेट केलं.’ अंगद याने स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या महिलांना देखील डेट केलं. अंगद म्हणाला, ‘अधिक कालावधीसाठी माझी कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती. पण जेव्हा मी दिल्लीतून मुंबईमध्ये आलो, तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या.’ अंगद याच्यासोबत अभिनेत्री नोरा फतेही हिचं देखील नाव जोडण्यात आलं.

अंगद बेदी यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल नोरा फतेही म्हणाली, ‘प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात या प्रसंगातून जाते. पण माझ्यासाठी हे थोडं कठीण होतं. यादरम्यान करिअरबद्दल मला काही कळत नव्हतं. सगळ्या गोष्टींना ब्रेक लागला होता….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. नोरा आणि अंगद यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्याने अभिनेत्री नेहा धुपिया यांच्यासोबत लग्न केलं.

जेव्हा अंगद आणि नेहा यांचं लग्न झालं तेव्हा नोराने अभिनेत्याला ओळख देखील दाखवली नाही. अंगद बेदीच्या लग्नाबद्दल नोराला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा नोराने ‘तो कोण आहे?’ असं म्हणत अंगदला टाळण्याचा प्रयत्न नोराने केला. पण आता नोरा आणि अंगद दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. नेरा तिच्या डान्समुळे कायम चर्चेत असते.

नोराने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. तर दुसरीकडे अंगद त्याच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. अंगद आणि नेहाचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा अभिनेत्री प्रेग्नेंट होती. लग्नानंतर नेहाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. अंगद आता पत्नी नेहा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

अंगदला त्यांच्या कुटुंहबासोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलं. अंगद याची पत्नी नेहा धुपिया देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नेहा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. शिवाय अनेक वादग्रस्त भूमिकांमुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.