हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदे याची झाली Angioplasty, जाणून घ्या कधी केली जाते आणि किती खर्च येतो?
Angioplasty : श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका, करण्यात आली अँजिओप्लास्टी, जाणून घ्या कधी केली जाते अँजिओप्लास्टी आणि यासाठी किती खर्च येतो? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होतात रुग्णावर उपचार
मुंबई | 16 डिसेंबर 2023 : गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाची शुटिंग पूर्ण करून मुंबईत परतलेल्या श्रेयस याला हृदयविकाराचा झटका येताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल होताच अभिनेत्याची अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेत्यावर सर्जरी यशस्वी ठरली आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
श्रेयस याच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींना हृदयविकाराचा झटका आला आहे. ज्यामुळे त्यांच्यावर देखील अँजिओप्लास्टी (Angioplasty) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर एंजियोप्लास्टी कधी करण्यात येते आणि यासाठी एकंदर किती खर्च येतो… याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे अँजिओप्लास्टी?
अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया हृदयविकाराच्या झटक्यामुळे ब्लॉक झालेल्या कोरोनरी धमन्या उघडण्यासाठी केली जाते. या प्रक्रियेत, हृदयाच्या स्नायूंमध्ये ब्लड सर्कुलेशन ओपन हार्ट सर्जरीशिवाय पुन्हा सुरळीत केलं जातं. सांगायचं झालं तर, अँजिओप्लास्टीला वैद्यकीय भाषेत पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (PCI) असं देखील म्हणतात.
हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णाची प्रकृती अतीगंभीर असल्यास अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. रुग्णाची प्रकृती लक्षात घेत डॉक्टर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करायची की नाही… यावर सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णावर पुढील उपचार होतात.
अँजिओप्लास्टीसाठी किती खर्च येतो?
प्रत्येक देशात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च वेगळा आहे. भारतात देखील वेगळ्या रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च वेगळा आहे. सरकारी रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च कमी असला तरी, इतर गोष्टींसाठी लागणारा खर्च वेगळा असतो. तर खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च 2 ते 3 लाख रुपये असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च वेगळा असतो.