तू असं करायला पाहिजे नव्हतं.. ‘ॲनिमल’मधील इंटिमेट सीन्सवर तृप्ती डिमरीचे आईवडील नाराज

‘ॲनिमल’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या सहा दिवसांत जगभरात कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबतच्या न्यूड आणि इंटिमेट सीन्समुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आली आहे.

तू असं करायला पाहिजे नव्हतं.. ‘ॲनिमल’मधील इंटिमेट सीन्सवर तृप्ती डिमरीचे आईवडील नाराज
‘ॲनिमल’ चित्रपटातील सीन्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 2:44 PM

मुंबई : 10 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईच करत नाहीये, तर सोशल मीडियावरही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून सोशल मीडियावर विविध मतमतांतरे मांडली जात आहेत. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यातील केमिस्ट्रीने तर सर्वांचं लक्ष वेधलंच आहे. पण त्याचसोबत चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या भूमिकेची एक वेगळीच क्रेझ पहायला मिळतेय. ‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबत तृप्तीने न्यूड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. याच सीन्समुळे ती प्रकाशझोतात आली आहे. तृप्ती रातोरात सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ठरली आहे. या सीन्सबद्दल विविध मुलाखतींमध्ये तृप्ती मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेविषयी सांगितलं आहे.

या मुलाखतीत तृप्तीने सांगितलं की तिच्या आईवडिलांनी ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिला असून त्यातील तिचे सीन्स पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रणबीरसोबतच्या इंटिमेटट सीन्समुळे त्यांना धक्का बसल्याचा खुलासा तृप्तीने केला. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती म्हणाली, “माझ्या आईवडिलांना जरा धक्का बसला. ते मला म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये असं काही पाहिलं नव्हतं आणि तू सुद्धा अशी कोणती भूमिका साकारली नव्हतीस. त्या सीन्सच्या विचारांतून बाहेर पडण्यास त्यांना थोडा वेळ लागला. पण त्यांनी मला समजून घेतलं. ते म्हणाले की तू हे सीन्स करायला पाहिजे नव्हतं, पण ठीके. पालक म्हणून आम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे.”

हे सुद्धा वाचा

तृप्तीने तिच्या पालकांना भूमिकेबद्दल समजावून सांगितलं. “मी त्यांना म्हणाले की मी काहीच चुकीचं करत नाहीये. हे माझं काम आहे आणि जोपर्यंत मी कम्फर्टेबर, सुरक्षित आहे, तोपर्यंत मला असे सीन्स करण्याबद्दल काहीच समस्या नसेल. मी एक अभिनेत्री आहे आणि मला भूमिकेसाठी 100 टक्के प्रयत्न करावे लागतील. मी या चित्रपटासाठी तेच केलंय”, असं तिने सांगितलं.

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत तृप्तीने ‘ॲनिमल’मधील न्यूड सीनपेक्षा ‘बुलबुल’मधील रेप सीन अधिक आव्हानात्मक असल्याचं सांगितलं होतं. सेटवर हे सीन शूट करताना फक्त चार जण उपस्थित असायचे, असाही खुलासा तृप्तीने केला होता. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “माझ्या मते बुलबुलमधील रेप सीन शूट करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण त्यात तुम्ही हार मानत आहात आणि ती हार मानणं खूप कठीण असतं. म्हणूनच त्या सीनच्या तुलनेत मला ‘ॲनिमल’मधील कोणतेच सीन्स कठीण वाटले नाहीत.”

पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त
पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त.
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल.
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?.
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण.
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?.
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?.
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'.
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ.
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय.